Ad will apear here
Next
अगा जे घडलेची नाही
श्रीराम बापट यांच्या कथांच्या माध्यमातून मानवी जीवन मानसशास्त्रीय पद्धतीने समोर आले आहे. पौगंडावस्थेतील तरुणांची मनोवस्था ते श्रद्धा-अंधश्रद्धापर्यंत विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. हे विषय जसे सामाजिक प्रश्न म्हणून समोर येतात, तसेच मानवी मनाची गुंतागुंत म्हणून! एकूण २१ कथांचा हा संग्रह आहे.

कथांमध्ये समाजातील विकृती जशा दिसतात, तसेच गुन्हेगारी जगही दिसते. ‘ते दहा’ या कथेत अतिरेक्यांची निर्घुण कृत्ये दिसतात. ‘अगतिकता’ आणि ‘परंपरेला दृढ चालवावे’ या दोन कथांमध्ये वृद्धांच्या समस्या हाताळल्या आहेत. वृद्धांचे आजारपण आणि कुटुंबीय ‘मी हरले मी जिंकले’ या कथेतून एका तरुणीचे भावविश्व उलगडते. ‘राग बुवांचा’ ही मुलाखतवजा कथा रंग भरते. पौगंडावस्थेतील मुलांची समस्या ‘विकृत’ या कथेतून हाताळली आहे. ‘डिप्रेशन’ आणि ‘नायगारा जल’ या कथा विनोदी आहेत.

प्रकाशक : राजेंद्र प्रकाशन
पाने : १५४  
किंमत : १७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language