Ad will apear here
Next
एच. जी. वेल्स, स्टीफन किंग
१८९५ साली आपल्या ‘टाइम मशीन’ या विज्ञान कादंबरीद्वारे जगाला कालप्रवास या अद्भुत संकल्पनेची ओळख करून देणारा द्रष्टा लोकप्रिय लेखक एच. जी. वेल्स आणि भयकथांचा बादशहा स्टीफन किंग यांचा २१ सप्टेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मधून त्यांचा थोडक्यात परिचय...
...............
हर्बर्ट जॉर्ज वेल्स
२१ सप्टेंबर १८६६ रोजी ब्रॉम्लीमध्ये जन्मलेला एच. जी. वेल्स हा ‘विज्ञानकथांचा बादशहा’ म्हणून जगन्मान्यता प्राप्त झालेला महान लोकप्रिय लेखक! ज्युल्स व्हर्नप्रमाणेच त्याच्या कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर गारूड केलं होतं. त्याचा इतिहास, समाजशास्त्राचाही अभ्यास होता आणि त्यानं पत्रकारिताही केली होती.

‘दी टाइम मशीन’ या त्याच्या पहिल्याच कादंबरीनं तुफान लोकप्रियता मिळवली. स्फटिक, हस्तिदंत आणि धातूपासून बनवलेल्या एका यंत्रातून त्या कादंबरीचा नायक ‘कालप्रवासी’ बनतो आणि वेगवेगळ्या काळात जातो. तिथं त्याला येणारे चित्तथरारक अनुभव वाचकांना न भूतो अनुभव देऊन गेले होते. आजही त्या कादंबरीची मोहिनी कमी झालेली नाही. कालप्रवास या त्यानं मांडलेल्या कल्पनेवर अनेकांनी सिनेमे बनवले.

दी आयलंड ऑफ डॉक्टर मॉरो’ आणि ‘दी इन्व्हिझिबल मॅन’ या त्याच्या पुढच्या दोन कादंबऱ्यांनी वेल्सची लोकप्रियता आणखीच वाढवली. त्यानंतर आली त्याची ‘दी वॉर ऑफ दी वर्ल्डस्’ ही कादंबरी, ज्यामध्ये त्यानं मंगळावरून पृथ्वीवर आलेल्या ‘मंगळ्यां’ची कथा मांडली होती. तीही कादंबरी अर्थातच प्रचंड गाजली. त्याच्या सर्वच कादंबऱ्यांवर उत्तमोत्तम सिनेमे निघाले आणि भरपूर चालले.

वेल्सची त्याचा समकालीन असलेला विनोदाचा बादशहा पी. जी. वुडहाउसशी मैत्री होती आणि त्यांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होत असे. त्यांना एकमेकांच्या लेखनाचं कौतुक होतं.

दी फर्स्ट मेन इन दी मून, लिटल वॉर्स, इन दी डेज ऑफ दी कॉमेट, शेप ऑफ थिंग्ज टू कम, स्व्हान नोवेल्स, दी फुड ऑफ दी गोडस्, ए शॉर्ट हिस्टरी ऑफ थे वर्ल्ड अशी त्याची अनेक पुस्तकं गाजली आहेत.

१३ ऑगस्ट १९४६ रोजी लंडनमध्ये त्याचा मृत्यू झाला.
............................

स्टीफन किंग 

२१ सप्टेंबर १९४७ रोजी पोर्टलँडमध्ये जन्मलेला स्टीफन किंग हा भयकथा, वैज्ञानिक कथा आणि अमानवी शक्तींच्या कथा लिहिणारा लेखक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानं आजपावेतो २००हून अधिक कथा आणि ५४ कादंबऱ्या लिहिल्या असून, त्यांचा खप ३५ कोटींच्या घरात जातो.

त्याची ‘डार्क टॉवर’ ही आठ कादंबऱ्यांची सीरिज प्रचंड गाजली. विज्ञानकथा, भयकथा, अद्भुत आणि वेस्टर्न यांचं एक वेगळंच मिश्रण असलेलं जग त्यानं त्यातून आपल्यासमोर आणलं. रोलंड डेस्खाइन हा बंदुकबाज (गनस्लिंगर) त्या कादंबऱ्यांचा हिरो. संपूर्ण विश्वाचं गूढ ज्यातून उकलेल असा ‘डार्क टॉवर’ आणि त्याच्या शोधात असणारा हा गनस्लिंगर यांच्या त्या अद्भुत कथांनी जगभरच्या वाचकांना वेड लावलं नसतं तरच नवल!

कॅरी, क्रीपशो, दी डेड झोन, १४०८, इट, मिझरी, शोशँक रिडम्प्शन, दी मिस्ट, स्टँड बाय मी, दी शायनिंग अशा त्याच्या अनेक गाजलेल्या कादंबऱ्यांवर सिनेमे निघाले आणि ते प्रचंड गाजले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi