Ad will apear here
Next
मान्सून २१ जूनला महाराष्ट्रात!


पुणे/मुंबई :
वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीवर झालेला दुष्परिणाम आता ओसरला असून, कर्नाटकात येऊन थांबलेल्या मोसमी वाऱ्यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. त्यामुळे २१ जून रोजी मान्सून गोवा आणि कोकणात दाखल होणार असून, २४-२५ जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. 

वायू चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल मंदावली असली, तरी आता त्याची पुढची वाटचाल वेगाने होईल, अशी अपेक्षा असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थितीमुळे होरपळलेल्या मराठवाडा आणि विदर्भात यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीचा वेग वाढणार असून, चार जुलैपर्यंत हे वारे देशाच्या ९० टक्के भागांत पोहोचतील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

पुढच्या दोन दिवसांत (१९, २० जून) मुंबई आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, दक्षिण कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

दरम्यान, १९ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तविला आहे.  १८ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांत मिळून ११६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, १२९.११ एवढ्या सरासरी पावसाची नोंद झाली आहे. २०१८मध्ये याच दिवसापर्यंत ४७६४ मिलिमीटर एकूण पावसाची नोंद झाली होती, तर सरासरी ५२९.३९ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language