Ad will apear here
Next
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची रत्नागिरीतील प्राथमिक फेरी २७, २८ सप्टेंबरला
कोकणातील ११ एकांकिका सादर होणार
रत्नागिरी : पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची यंदाची कोकण विभागाची प्राथमिक फेरी २७ आणि २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. रत्नागिरीतील फेरीचे हे अकरावे वर्ष असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतील ११ एकांकिका या फेरीत सादर होणार आहेत. 

या एकांकिकांचे सादरीकरण स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार असून, २७ सप्टेंबर रोजी  सकाळी उद्घाटन होणार आहे. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता तरुण उद्योजक राजेंद्र मलुष्टे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.

‘महाराष्ट्रीय कलोपासक’तर्फे गेली ६० वर्षे पुणे येथील ज्येष्ठ रंगकर्मी (कै.) पुरुषोत्तम वझे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, महाविद्यालयीन युवक :युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते. पुणे केंद्रासोबतच, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर आणि जळगाव या केंद्रांवरही एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी होते. प्राथमिक फेरीमधील पहिल्या यशस्वी चार संघांना पुणे येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश दिला जातो. अंतिम फेरीच्या वेळचा या चारही संघांचा खर्च ‘महाराष्ट्रीय कलोपासक’तर्फे केला जातो.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांमधील ११ एकांकिका प्राथमिक फेरीत सादर होणार असून, या सर्व एकांकिका सर्वांना मोफत पाहता येतील. जास्तीत जास्त रसिकांनी व कॉलेज तरुण :तरुणींनी या एकांकिका पाहायला यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

एकांकिका स्पर्धेचे वेळापत्रक
२७ सप्टेंबर :
दुपारी एक वा. : मर्सिया (मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)
दु. दोन : काय? (देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी)
दु. तीन : वन डे सेलिब्रेशन (एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी)
सायं. चार : बारा किलोमीटर (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण)
सायं. पाच : टाइम हाउस (राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव)
सायं. सहा : नाइंटीज नॉट आउट (फिनोलेक्स अॅकॅडमी, रत्नागिरी)

२८ सप्टेंबर :
स. १० : हिरवीन (डीबीजे, चिपळूण)
स. ११ : कविता (स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड)
दु. १२ : एचटू एस ओफोर (कृषी महाविद्यालय, दापोली)
दु एक : जस्ट मॅरीड (अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली)
दु. दोन : शिक्का (संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi