Ad will apear here
Next
नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी धरला फेर


रत्नागिरी :
मिरजोळे एमआयडीसी येथील दी यश फाउंडेशन्स नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नवरात्रौत्सवानिमित्त रास गरब्याचे आयोजन केले होते. 

या कॉलेजमध्ये एएनएम, जीएनएम, पीबीबीएस्सी, बेसिक बीएस्सी नर्सिंग आदी विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व विद्यार्थी सजून आले होते. नर्सिंगच्या शिक्षणानंतर कायमस्वरूपी रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत स्वीकारणार असलेल्या या विद्यार्थ्यांनी देवी शारदेची प्रार्थना केली. नर्सिंग कॉलेजमधील अनेक मुली रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यांतून व कोकणाच्या विविध जिल्ह्यांतून आल्या आहेत. त्या त्या ठिकाणची संस्कृती गरबा नृत्यातून पाहायला मिळाली. 



नवरात्रौत्सवात अन्य ठिकाणी दांडिया स्पर्धा, गरबा नृत्य होत असताना या विद्यार्थ्यांनीही नृत्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमाबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने, सहव्यवस्थापकीय विश्वस्त माधवी माने, मिहिर माने, प्राचार्या डॉ. मीनाक्षी देवांगमठ आणि रजिस्ट्रार शलाका लाड, तसेच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.





(झलक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi