Ad will apear here
Next
सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘मेकॅट्रॉनिक्स दिन’ साजरा

कुसगाव : येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नुकताच ‘मेकॅट्रॉनिक्स दिन’ साजरा करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या २१ गटांनी भाग घेतला. या स्पर्धेत एक किलोग्रॅम वजन उचलण्याची क्षमता असणाऱ्या आणि खडकाळ भागात चालू शकणाऱ्या रोबोटला प्रथम क्रमांक मिळाला. हॉलमध्ये कोणीही नसेल, तर विद्युत उपकरणे बंद होणारी यंत्रणा, सौरऊर्जेवर चालणारी यंत्रणा अशा विविध संकल्पना विद्यार्थ्यांनी मांडल्या होत्या. 

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एम. एस. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, डॉ. व्ही. व्ही. देवतारे, प्रा. विकास रासकर, प्रा. दिपाली डूचे आदींसह प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग या वेळी उपस्थित होता. विदयार्थी प्रतिनिधी शुभम टाकवले, निलेश बागडे, श्रद्धा पारखी, मयुरी देशमुख, सायली गुरव, अनिकेत उडमाने, सुमित रुखमगड, तन्मय टिकेकर, धनश्री शेटे, राहुल कुमार, सौरव सैंदणे, निखिल मिश्रा, प्रफुल्ल लेझे यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi