Ad will apear here
Next
बाललैंगिक अत्याचारांना प्रतिबंधासाठी डॉ. मनीषा करताहेत जनजागृती
नाशिक : बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार हा फार चिंतेचा विषय आहे. त्यावर मात करण्यासाठी लहान मुला-मुलींमध्ये, तसेच महाविद्यालयांमध्ये जागृती करण्याचे काम नाशिकमधील डॉ. मनीषा रौंदळ यांनी हाती घेतले आहे. 

चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यांमधील फरक काय, हे डॉ. मनीषा रौंदळ शाळेतील मुला-मुलींना समजावून सांगत आहेत. अनेक वेळा लहान मुले आमिषाला बळी पडतात आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. समाजातील अशा प्रवृत्तीची माणसे कशी ओळखायची, याचे प्रात्यक्षिक डॉ. रौंदळ दाखवत आहेत. त्याशिवाय शालेय मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या संदर्भातही त्या जागृती करीत आहेत. आतापर्यंत अनेक शाळा-महाविद्यालयांत त्यांनी अशी जागृती केली आहे.

डॉ. मनीषा रौंदळ या नाशिकच्या सायकलिस्ट असोसिएशनच्या सक्रिय सभासद आहेत. नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने सध्या सुरू असलेल्या वर्षभरात बाललैंगिक अत्याचारावर वजनजागृती करण्याचे धोरण हाती घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून डॉ. रौंदळ यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाची सध्या नाशिकमध्ये चर्चा होत आहे. 

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi