Ad will apear here
Next
‘एमटीडीसी’कडून आषाढी वारी दर्शन सहलीचे आयोजन

पुणे : ‘सध्या सुरू असलेल्या आषाढी वारीमधील आगळावेगळा सोहळा, तसेच वारकरी बांधवांना अनुभवास येणारी अध्यात्मिक अनुभूती शहरी माणसांनादेखील अनुभवण्यास मिळावी, या हेतूने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) या वर्षीदेखील वारी दर्शन सहलीचे आयोजन केले आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थपक चंद्रशेखर जयस्वाल यांनी दिली.

आषाढी एकादशीचा ‘पालखी सोहळा’ ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. पालखी म्हटले की सगळीकडेच वारकरी, टाळ–मृदूंगांचा नाद आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते. या नयनरम्य पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी येतात. विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले लाखो वारकरी यात सहभागी होतात आणि पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करतात. या पालखी सोहळ्यातून अध्यात्मिक, अनुभवात्मक पर्यटन वाढावे या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळकडून गेल्या वर्षी आषाढी वारी सहलीचे आयोजित करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या वर्षीदेखील या साहिलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

या सहलीदरम्यान दिंडीसोबत चालण्याचा, तसेच दिंडीच्या दिनक्रमाचा अनुभव सहभागी पर्यंटकांना मिळणार आहे. प्रादेशिक कार्यालयाचे दीपक हरणे, स्नेहल काळे, जयंत डोफे आणि पांडुरंग तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. एक ते दोन जुलै या कालावधीत पळशी ते उंडवडे येथे दोन दिवस व एक रात्र अशी ही सहल आहे. लोणंद ते तरडगाव या एक दिवसाच्या सहलीचे तीन जुलैला आयोजन केले आहे. फलटण ते वाखरी दोन दिवस व एक रात्रीची सहल नऊ व १० जुलै या दिवशी होईल. 

पर्यटकांनी वारी दर्शन सहलीच्या आरक्षणासाठी ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग, ससून हॉस्पिटलसमोर, पुणे येथे किंवा (०२०) २६१२ ६८६७, २६१२ ८१६९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language