Ad will apear here
Next
धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील तीन कब्रस्तानमध्ये स्वच्छता
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कब्रस्तानमध्ये स्वच्छता अभियान राबवताना श्री सदस्य.

रत्नागिरी :
डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुखच्या श्री सदस्यांनी कब्रस्तान स्वच्छता मोहीम हाती घेऊन हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. रत्नागिरी, कोकणनगर येथील कब्रस्तान, संगमेश्वर मापारी मोहल्ला व देवरुख येथील सोळजाई मंदिर रोडवरील कब्रस्तान या ठिकाणी श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. जात-धर्म आड न आणता, माणुसकी हाच सर्वांत मोठा धर्म आहे ही श्री समर्थ बैठकीची शिकवण अंगीकारत ८०३ श्री सदस्यांनी तीन ठिकाणचे कब्रस्तान स्वच्छ केले. यामध्ये एकूण १९ हजार २२५ चौरस मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला. आठ टन ओला व चार टन सुका कचरा गोळा करण्यात आला. या उपक्रमाबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे. दर वर्षी प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी म्हणजे शासकीय कार्यालये, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून समाजसेवा केली जाते.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language