Ad will apear here
Next
पुण्यातील पूरग्रस्तांसाठी पोळी-भाजी देण्याचे आवाहन
महापालिकेच्या कर्मचारी सुप्रिया परदेशी यांचा उपक्रम

पुणे : पुण्यात अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले असून, अनेक नागरिकांना विविध ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. घरदार सोडून केवळ अंगावरच्या वस्त्रानिशी अशा ठिकाणी आश्रय घेतलेल्या या नागरिकांमध्ये वृद्ध, अपंग, लहान मुले, महिला यांचा समावेश आहे. त्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचारी सुप्रिया परदेशी यांनी पोळी-भाजी देण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी मदत करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. 

‘इच्छुक नागरिकांनी दोन पोळ्या आणि भाजी व्यवस्थित पॅक करून महानगर पालिकेच्या सुरक्षा कक्षात मंगळवारी, ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत आणून द्यावे, पूरग्रस्तांसाठी माणुसकीचा हात पुढे करावा,’ असे आवाहन परदेशी यांनी केले आहे. 

दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, अग्निशमन दल, पोलीस दल यांनी सांगवी, सिंहगड रस्ता, बाणेर अशा विविध भागांमधील पाण्याने वेढलेल्या सोसायट्यांमधील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. 

अधिक माहितीसाठी : सुप्रिया परदेशी : ९५५२५ ३४४५१ 


 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi