Ad will apear here
Next
‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांसाठी विविध सुविधा
मुंबई : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एफआयएल) आणि कंपनीची सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) पंढरपूरच्या वारकऱ्यांना वारीदरम्यान सुविधा उपलब्ध करून दिल्या. यात वारकऱ्यांना त्यांच्या चीजवस्तू ठेवण्यासाठी टिकाऊ पिशव्या, वैद्यकीय शिबिरे आणि रात्रीच्या विश्रांतीसाठी तीन थांब्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे. 

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत सोपानकाका यांच्या तीन पालख्यांदरम्यान १३ ठिकाणी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले. या वैद्यकीय शिबिरांमध्ये ससून हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि परिचारिकांनी सहभागी होत वारकऱ्यांच्या आरोग्यविषयक गरजा पुरवल्या. या शिबिरामध्ये वारकऱ्यांना ताप, डोकेदुखी, दुखापती, अपचन, अशक्तपणा आदी समस्यांसाठीही उपचार करण्यात आले. वैद्यकीय टीमने वारकऱ्यांना अलर्जी, शरीरातील पाणी कमी होणे, तसेच डोळे व कानाच्या समस्यांबाबतीतही मदत केली. वारकऱ्यांना काही मूलभूत औषधे, ग्लुकोज पॅक्ज आणि प्रथमोपचाराचे साहित्य असलेली झिप लॉक्स पाउचेसही देण्यात आली. कंपनीने इतर वैद्यकीय उपचारांसाठी वैद्यकीय व्हॅन्सही तैनात केल्या होत्या. सुमारे २५ हजार लोकांनी या वैद्यकीय शिबिरांचा लाभ घेतला.

वारकऱ्यांची मदत करणाऱ्या या उपक्रमांचा एक भाग म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने पंढरपूर देवस्थानापर्यंत पोहोचण्याच्या वारकऱ्यांच्या प्रदीर्घ प्रवासात आपल्या चीजवस्तू ठेवण्यासाठी त्यांना दोन लाख दणकट, टिकाऊ आणि जलप्रतिबंधक पिशव्यांचे वाटप केले. वाटप केलेल्या इतर महत्त्वाच्या वस्तूंमध्ये एक लाख हरीपाठ, २५ हजार कुंच्या आणि १० हजार गांधी टोप्यांचाही समावेश होता.

या प्रसंगी फिनोलेक्सच्या विक्री आणि विपणन विभागाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी म्हणाले, ‘पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करायला मिळणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व स्तरांतील लोक विठोबा माऊलीच्या भेटीसाठी पायी चालत जातात. वाटेत तीन ठिकाणी बांधलेल्या विश्रांतीगृहांमुळे त्यांना विश्रांती घेण्यासाठी आणि पुढील प्रवासासाठी ताजेतवाने होण्यासाठी मदत मिळेल. पिशव्या, तसेच वैद्यकीय शिबिरांमुळे आम्हाला २५ हजार लोकांना मदत करणे शक्य झाले. एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक या नात्याने फिनोलेक्स इंडस्ट्रीमध्ये आम्ही समाजापर्यंत पोहोचत धार्मिक एकात्मकता आणि एकत्रीकरण जपण्यास प्राधान्य देतो.’

पंढरपूरच्या प्रवासादरम्यान लागणाऱ्या कुरोली, लोणी काळभोर आणि वाखारी जिल्हा या ठिकाणी तीन विश्रांती गृहे बांधण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळेस वारकऱ्यांना विश्रांती घेता यावी आणि दुसऱ्या दिवशीच्या पालखीसोबतच्या प्रवासासाठी ताजेतवाने होता यावे या हेतूने ही विश्रांतीगृहे बांधण्यात आली आहे. त्यांचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख आणि त्यांची मदत करणाऱ्या प्रांत अधिकारी सचिन ढोले, बीडीओ श्री. घोडके, तहसीलदार, गाव विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन २०१४पासून आरोग्यसेवा, स्वच्छता, सामाजिक कल्याण, शिक्षण, जलसंवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रात काम करत आहेत.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language