Ad will apear here
Next
‘निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा’


सोलापूर : ‘लोकसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन होईल याकडे लक्ष देऊन काम करावे,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे दिल्या.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पाहणीसाठी दोन मार्च २०१९ रोजी डॉ. म्हैसेकर सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. त्या वेळी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या दौऱ्यात त्यांनी टेंभुर्णी, मोहोळ येथील मतदान केंद्राची पाहणी केली. त्याचबरोबर सोलापूर येथील रामवाडी येथील गोदामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे समन्वय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.
 
या बैठकीला जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल भोसले उपस्थित होत्या.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘निवडणूक आयोगाच्या प्रत्येक गोष्टीसाठी सूचना आहेत. काम कशा पद्धतीने करावे, कोणती काळजी घ्यावी, प्रक्रिया कशी राबवावी याबाबत सविस्तर सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना आणि निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध समित्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.’

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठकीत जिल्ह्यातील तयारीबाबत माहिती दिली. त्यावर डॉ. म्हैसेकर यांनी काही सूचना केल्या.

या वेळी उपजिल्हाधिकारी किशोर पवार, उत्तम पाटील, शिवाजी जगताप, दीपक शिंदे, मोहिनी चव्हाण, ज्योती कदम, ज्योती पाटील, तहसीलदार रमा जोशी, डी. एस. कुंभार, श्रीकांत पाटील, जयवंत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, एनआयसीचे मोहन बाशिराबादकर, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम आदी उपस्थित होते. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language