Ad will apear here
Next
बहारदार कार्यक्रमांनी कानसेन संमेलन रंगले!


रत्नागिरी :
‘कानसेन’ या व्हॉट्सअॅप ग्रुपचे चौथे संमेलन नुकतेच रत्नागिरीत पार पडले. यात सांगीतिक कार्यक्रमांसह विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आले. शास्त्रीय गायक ते बाथरूम सिंगर या सर्वांसाठी सादरीकरणाची समान संधी हे या संमेलनाचे वैशिष्ट्य होते.

रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच औरंगाबाद, तासगाव, मिरज, पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून कानसेन ग्रुपचे सदस्य संमेलनासाठी उपस्थित राहिले होते. उद्धव खाडिलकर, सुधीर मोघे, अजय पुरोहित, स्वरदा देसाई, जस्मिन जोगळेकर आदी पाहुण्या सदस्यांच्या हस्ते नटराज पूजनाने संमेलनाला सुरुवात झाली. त्यानंतर नांदी झाली आणि वातावरण संगीतमय झाले. 

लहान मुलांचे कार्यक्रम, मराठी आणि हिंदी निवडक गीतांचे सांगीतिक कार्यक्रम, समूहातील लोकांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, ट्रॅकवरील गाणी, सुगम लाइव्ह संगीत मैफल अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. 

विविध गुणदर्शनात गार्गी गाडगीळ, इरा गोखले, आर्या जोगळेकर यांनीही धमाल उडवून दिली. काव्य, नाट्य, चारोळ्या, कथा, नृत्य यांच्या सादरीकरणाने कार्यक्रम बहारदार झाला. गदिमा, बाबूजी आणि स्नेहल भाटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची गीते सादर करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

निरंजन गोडबोले, विनय वळामे (संवादिनी), हेरंब जोगळेकर, पांडुरंग बर्वे, निखिल रानडे, अमेय भडसावळे (तबला), आमोद गोळे (हँडसोनिक), उदय गोखले (व्हायोलीन), मंगेश चव्हाण (पखवाज-ढोलक), राजू किल्लेकर, मंगेश मोरे (सिंथेसायझर), प्रवीण पवार (ऑक्टोपॅड) आदींनी दिवसभरातील विविध सत्रांना संगीतसाथ केली. 

मानसी लिमये, गौरी सावंत, यशश्री पुरोहित, मीरा भावे यांनी मराठी-हिंदी गीतांच्या कार्यक्रमांचे निवेदन केले. प्रिया गोखले, पांडुरंग बर्वे, रुद्र गाडगीळ, संजय पाटणकर, प्रिया फडके, संध्या सुर्वे, प्रसाद गाडगीळ, विश्वास जोगळेकर आदींनी विविध संयोजन समित्यांचे प्रमुख म्हणून काम पाहिले. राजू बर्वे यांनी ध्वनिव्यवस्था सांभाळली.

कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी, तसेच त्यांच्या कर्मचारी वर्गाने चहा-नाश्ता, भोजनाची व्यवस्था केली होती. ट्रॅकवरील गाण्यांच्या सत्रात दृकश्राव्य सादरीकरणाने बहार आणली. यासाठी मैथिली सावरे व संजय पाटणकर यांनी परिश्रम घेतले. अंबर हॉलचे मालक आणि कानसेन समूहाचे अॅडमिन संजीव वेलणकर, सुनीता गाडगीळ, तसेच सुहास ठाकुरदेसाई आणि कौस्तुभ सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘सूररंगी रंगले’ या सदरातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘सुनहरे गीत’ या सदरातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिककरा. ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi