Ad will apear here
Next
हिंदू महिला सभेतर्फे नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

पुणे : ‘हिंदू महिला सभेच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रविवार, २९ सप्टेंबर ते सोमवार, सात ऑक्टोबर दरम्यान सदाशिव पेठेतील श्री शिवाजी मंदिर येथे हे कार्यक्रम होणार आहेत,’ अशी माहिती सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले यांनी दिली. 

संस्थेच्या नवरात्री महोत्सवाचे हे ६९ वे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवात २९ सप्टेंबर रोजी श्रुती व प्रतिक पोळेकर यांच्या हस्ते घटस्थापना होणार असून, याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ‘कल्पनेच्या पलीकडे’ या कार्यक्रमात माधुरी ताम्हाणे आपले पत्रकारितेतील रोचक अनुभव दृकश्राव्य माध्यमातून सादर करणार आहेत. सोमवारी, सायंकाळी ५.३० वाजता ‘नाट्यभावधारा’ हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम गौरी गोळे व सहकारी सादर करणार आहेत. मंगळवारी, सायंकाळी ५.३० वाजता रामरक्षा या विषयावर धनश्री लेले यांचे व्याख्यान होणार आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता यशश्री व सुयोग आठवले यांच्या हस्ते ‘देवीयाग’ होणार असून, त्यानंतर सकाळी दहा वाजता शहीद सैनिकांच्या मुलींचे ‘‘कुमारिका पूजन’ करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी पाच वाजता ‘दुर्गा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. त्यानंतर वसुधा मेहंदळे यांचे ‘कथाकथन’ होणार आहे.

गुरुवारी, सायंकाळी ५.३० वाजता मानसी जोशी यांचे कीर्तन होणार आहे, तर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता ‘ऐलमा पैलमा’ हा आधुनिकता आणि परंपरा यांचा गोफ विणणारा निरूपणाचा कार्यक्रम हेमा लेले सादर करणार आहेत. शनिवारी, अष्टमीला सकाळी नऊ वाजता महालक्षी पूजन होणार असून, सायंकाळी सात वाजता महालक्ष्मी दर्शन मिळणार आहे. रविवारी, सायंकाळी ५.३० वाजता गाजलेली भक्तिगीते, अभंग, गवळण, भारुड आदीवर आधारित ‘जाऊ देवाचिया गावा’ हा कार्यक्रम मंगला चितळे व सहकारी सादर करणार आहेत, तर सोमवारी, सात सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘तो व ती’ हा कार्यक्रम उमा नेने सादर करणार आहेत.

या नऊ दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये नऊ दिवस विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी याच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, मुंबईच्या ‘आम्ही उद्योगिनी’च्या संस्थापिका मीनल मोहाडीकर, पुण्यातील ‘लोटस खाकरा’ व ‘शबरी खाकरा’ उद्योगाच्या उद्योजिका मनीषा दुगड, ‘सोहम ट्रस्ट’चे संस्थापक डॉ. मनीषा व डॉ. अभिजित सोनावणे, पुण्यातील ‘लागू बंधू मोतीवाले’ उद्योगाच्या अंजली लागू, महाड येथील ‘डी. जी. साबळे कंपनी’च्या शीला साबळे, ‘माझी मैत्रीण चॅरीटेबल ट्रस्ट’च्या कार्यकारी विश्वस्त शैला लिमये, ‘आस फाउंडेशन’च्या अनघा ठोंबरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi