Ad will apear here
Next
सिंहगड शिक्षणसंस्थेच्या लोणावळा कॅम्पसमध्ये करिअर मार्गदर्शन
सचिन जोसेफ यांचे स्वागत करताना कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई

कुसगाव : येथील सिंहगड शिक्षणसंस्थेच्या एन. बी. नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये विमानवाहतूक क्षेत्रामधील नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील फ्लाय हाय एव्हिएशन अॅकॅडमीतर्फे या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील नवनवीन संधींबाबत माहिती देण्यात आली. या अॅकॅडमीची पवई, नवी मुंबई, नालासोपारा, अहमदाबाद व पुणे येथे शाखा आहेत. करिअर कौन्सिलर सचिन जोसेफ यांनी एअर होस्टेस, फ्लाईट पर्सन, एअर ट्रॅफिक असिस्टंट, एअरपोर्ट टर्मिनल मॅनेजमेंट इत्यादी विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली. 


कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी सचिन जोसेफ यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. नितीन जोशी, प्रा. इक्बाल हवालदार यांनी केले होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language