Ad will apear here
Next
भिवंडीतील अंकुश ठाकरे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार


भिवंडी :
जिल्हा परिषदेमार्फत झालेल्या शिक्षक गौरव सोहळ्यात भिवंडीतील अंकुश ठाकरे यांना २०१८ -२०१९ या शैक्षणिक वर्षासाठीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. 

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील. खासदार कपिल पाटील, हातमांग महामंडळ अध्यक्ष तथा शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे आदी मान्यवरांसह जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते. 

अंकुश ठाकरे ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून गेली २६ वर्षे कार्यरत आहेत. शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले. संपूर्ण महाराष्ट्रात विज्ञानाची वारी या उपक्रमांतर्गत त्यांनी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून घेतले. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत भिवंडी तालुक्यात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी शासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१६मध्ये त्यांना भिवंडी पंचायत समितीकडून भिवंडी तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language