Ad will apear here
Next
मेरी कोम, सायना यांच्या उपस्थितीत ‘फिट फॅमिलिज फेस्ट’ साजरा
दोन हजारपेक्षा अधिक लोकांचा सहभाग

पुणे :  मुष्टीयुद्धपटू मेरी कोम,  बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या उपस्थितीत हर्बालाइफ न्यूट्रिशनतर्फे आयोजित ‘फिट फॅमिलिज फेस्ट’चे दुसरे पर्व मोठ्या उत्साहात पार पडले. तब्बल दोन हजारहून अधिक लोक यात सहभागी झाले होते.

या वेळी हर्बालाइफ भारताच्या फिटनेस व शिक्षण समुपदेशक आणि क्रीडा वैज्ञानिक शायमल वल्लभजी आणि हर्बालाइफ न्यूट्रिशन इंटरनॅशनल इंडियाचे उपाध्यक्ष आणि कंट्री हेड अजय खन्ना उपस्थित होते. या वेळी हिंदी रॉक बँड अंतरिक्ष आणि एम.ए.डी या लोकप्रिय सिरीजमधील रॉब  यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

या वेळी सायना नेहवाल म्हणाल्या, ‘या फेस्टचा पुन्हा एकदा भाग होता आले याचा मला आनंदच झाला आहे. फेस्ट दरवर्षी वाढतो आहे हे पाहणे अतिशय थरारक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामुळे कुटुंबांना फिटनेसशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाते. आपल्या देशातील लोकांमध्ये निरोगी जीवनशैलीबद्दलची जागरुकता आणि स्वारस्य वाढवण्यासाठी हर्बललाइफने हा उपक्रम सुरू केला आहे, यामुळे संपूर्ण भारतभर हा संदेश पोहोचवता येईल.’

आपल्या संपूर्ण कुटुंबासह या फेस्टमध्ये सहभागी झालेल्या मेरी कोम म्हणाल्या, ‘फिट फॅमिलिज फेस्टमध्ये मला पुन्हा सहभागी होता आले, त्यासाठी मी आनंदी आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी मी माझ्या कुटुंबियांबरोबर येथे सहभागी झाले आहे आणि कुटुंबासाठी उपक्रम राबवण्याची ही उत्तम संकल्पना आहे असेही मला वाटते. आपली क्षमता ओळखणे आणि आपल्या मर्यादा वाढवणे यासाठी अशा फेस्टच्या निमित्ताने समाजातून  लोकांना एकत्र करणे, त्यांना प्रेरणा देणे आणि त्यांनी सर्वात निरोगी व स्वास्थपूर्ण जीवन जगण्याचे ठरवणे हाच  उद्देश आहे. आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली अंगिकारणे याचाही प्रसार या फेस्टमधून केला जातो.’

अजय खन्ना म्हणाले, ‘फिटनेस प्रती जागरुक नसलेल्या सर्व स्तरातील लोकांना निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरित करणे हेच ‘फिट फॅमिलिज फेस्ट’चे उद्दिष्ट आहे. एकत्रितपणे धावणे, सायकल चालवणे, योग करणे, झुम्बा, ड्रम जाम सेशन करणे आणि मुलांसाठी पारकोरचे आयोजन करणे यांसारखे ऊर्जा निर्माण करणारे उपक्रम राबवले जातात. गेल्या वर्षीपेक्षा यंदा फिट फॅमिलिज फेस्ट अधिक विस्तारला आहे, याचा आनंद आहे. या उपक्रमामुळे जास्तीत जास्त लोकांना प्रेरणा, उत्साह मिळेल आणि ते आमच्याबरोबर व्यायामाशी नियमितपणे जोडले जातील आणि संतुलित आहाराला प्राधान्य देतील, अशी आशा वाटते.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language