Ad will apear here
Next
डॉ. बसवेश्वर चेणगे यांना राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार
मिझोरामचे माजी राज्यपाल अमलोक रतन कोहली यांच्या हस्ते  पुरस्कार स्वीकारताना अनिकेत चेणगे, शेजारी इतर मान्यवर.

सातारा : महाराष्ट्र मंडळ, दिल्ली मराठी मंडळ व पुढचे पाऊल संस्था या राजधानी नवी दिल्लीतील मराठी संस्थांच्या वतीने मराठी भाषा व मराठी साहित्य चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कराड तालुक्यातील मसूरचे सुपुत्र, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांचा राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

नवी दिल्लीत आंध्र भवनमध्ये आयोजित अखिल भारतीय प्रतिभा साहित्य संमेलनात मिझोरामचे माजी राज्यपाल अमलोक रतन कोहली यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. बसवेश्वर चेणगे यांच्या वतीने नवी दिल्लीत शिक्षण घेत असलेला त्यांचे चिरंजीव अनिकेत याने हा पुरस्कार स्वीकारला.  या वेळी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, मानवाधिकार आयोगाचे सदस्य, माजी राजदूत व प्रसिद्ध लेखक ज्ञानेश्वर मुळे, राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष मनोहर जाला, आंध्र भवनचे सहआयुक्त डॉ. के. लिंगा राजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. चेणगे यांचे अभिनंदन केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi