Ad will apear here
Next
डॉ. धनंजय दैठणकर यांना ‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार’ प्रदान
‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार’ संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांना डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुणे : गानवर्धन संस्था आणि उद्योजक तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या वतीने ‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार’ संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांना डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला शारंग नातू, नृत्य कलाकार स्वाती दैठणकर, गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, नीलिमा राडकर, वासंती ब्रह्मे, डॉ. राजश्री महाजनी उपस्थित होते. 

‘संगीत निर्मितीबरोबर संगीत ऐकणे ही कला आहे. ही अमूर्त कला असल्याने त्याच क्षणी तिचा अनुभव घ्यावा लागतो. बदल करण्याची संधी नसते. सादरीकरणाच्या कला एकांतात नव्हे; तर रसिकांच्या साक्षीने आणि त्यांना बरोबर घेऊन सादर होतात. अशा वेळी अधिक आशयघन निर्मिती होण्यासाठी चांगले श्रोते असणेही आवश्यक आहे,’ असे डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.

‘देशाच्या कला-संस्कृतीचे संवर्धन करणे, तिचा प्रसार करणे ही जबाबदारी आपण विसरलो आहोत. सामान्य माणसाला जीवनाकडे नव्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा काळात सुसंस्कृत परंपरा आपण पुढे न्यायची गरज आहे,’ असेही त्या म्हणाल्या.  

‘हा माझ्या वाद्याचा आणि गुरूंचा सन्मान आहे. संतूर वाद्य फारसे परिचित नव्हते, त्या वेळी पं. शिवकुमार शर्मा यांनी या वाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. मी मूळचा तबलावादक आहे. संतूर तयार केल्याने आवड निर्माण झाली आणि शिकलो,’ अशी भावना दैठणकर यांनी व्यक्त केली. 


या वेळी संगीत स्पर्धेतील नैनिका बंदी, रसिका कुलकर्णी, मृदुला तांबे, मोनिका सोनी, सुनीता भट आणि मानसी देसाई या विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. प्राची घोटकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात धनंजय दैठणकर यांचे संतूरवादन झाले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi