Ad will apear here
Next
सागरी प्रदूषण रोखण्यासाठी भारताचा नॉर्वेशी करार

नवी दिल्ली : जगभरात सागरी प्रदूषणाची समस्या गंभीर होत असून, या समस्येवर मात करण्यासाठी भारत आणि नॉर्वे संयुक्तपणे उपाययोजना राबवणार आहेत. याबाबत भारताचे पर्यावरण मंत्रालय आणि नॉर्वेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी, ११ फेब्रुवारी २०१९ रोजी याबाबत एका करारावर शिक्कामोर्तब केले. नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबेर्ग यांनी जानेवारी २०१९ मध्ये भारताला भेट दिली होती, त्या वेळी भारत आणि नॉर्वेमध्ये सागरी क्षेत्रातील सहकार्याबाबत संवाद वाढविण्याचा सामंजस्य करार करण्यात आला होता. त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने हे पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे.   


या कराराद्वारे स्थानिक पातळीवर प्रशासनाला कचरा व्यवस्थापन, कचरा गोळा करण्यासाठी यंत्रणा विकसित करणे यासाठी मदत करणे, समुद्रात प्रदूषण करणाऱ्या कचऱ्याचे स्रोत शोधणे, त्याचे व्यवस्थापन करणे, या क्षेत्रात खासगी क्षेत्राची गुंतवणूक वाढवणे याकरता दोन्ही देश सहकार्य करणार आहेत. त्याचबरोबर समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे, जनजागृती अभियान राबवणे, प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्माण करून ते, सिमेंट उत्पादनासाठी लागणाऱ्या कोळशाला पर्याय म्हणून वापरणे आदी बाबतीत दोन्ही देश परस्पर सहकार्य करणार आहेत. 

जानेवारी २०१९ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबेर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त निवेदन जारी करताना.

गेल्या महिन्यात भारत आणि नॉर्वे यांनी या क्षेत्रात एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला. या निळ्या अर्थव्यवस्थेसाठी सरकारी अधिकारी, संशोधक, तज्ज्ञ, खासगी क्षेत्र यांचा सहभाग असलेले एक संयुक्त कृती दल निर्माण करण्यात आले असून, जहाज वाहतूक तसेच ऊर्जानिर्मिती यासह अन्य क्षेत्रात शाश्वत उपाययोजना विकसित करण्यासाठी ते काम करणार आहे. 

समुद्रातून मासे, वनस्पती, खनिजे, तेल, वायू अशी अनेक प्रकारचे संपत्तीचे स्रोत मिळतात. मात्र, बेजबाबदारपणे केली जाणारी मासेमारी, वाहतूक, कचरा, वातावरण बदल असे अनेक धोके समुद्राला घातक ठरत आहेत. अनेक स्रोतांद्वारे माणसाला आर्थिक लाभ देणारी ही निळी अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. या नैसर्गिक संपत्तीचे स्रोत जपणे, त्यांचे संवर्धन करणे, त्यातील जैवविविधतेचे आयुर्मान वाढवणे आणि एक आरोग्यदायी सागरी परिसंस्था निर्माण करणे आवश्यक आहे. समुद, महासागर स्वच्छ आणि चांगले राहावेत यासाठी भारत आणि नॉर्वे प्रयत्न करणार आहेत. यामुळे या निळ्या अर्थव्यवस्थेचा शाश्वत विकास होण्यास मदत मिळेल, असा विश्वास उभय देशांनी व्यक्त केला आहे. 

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language