Ad will apear here
Next
‘फंडूगिरी’ म्युझिक व्हिडिओला ‘रिक्षावाला’फेम रेश्मा सोनावणेचा आवाज!


मुंबई :
‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गीतामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळालेली गायिका रेश्मा सोनावणे हिने ‘फंडूगिरी’ या नव्या म्युझिक व्हिडिओला आवाज दिला आहे.

‘पप्पी दे पारूला’, ‘गुलाबी नोट दोन हजारांची’, ‘साजूक तुपातली’ यांसारख्या रेश्माने गायलेल्या गाण्यांनी यश मिळविले. संगीतकार वेगळ्या दमदार आवाजातील उडत्या गाण्यांसाठी तिला निमंत्रित करू लागले. तिची जवळपास सर्वच गाणी सुपरहिट झाली आहेत. आता ती नव्या अल्बममधून समोर येत आहे.‘फंडूगिरी’तील या गाण्याचे बोल ‘मन माझे झाले कसे उधाण..’ असे आहेत. आकाश पवार यांच्या शब्दांना प्रणय प्रधान आणि राजू पांचाल या संगीतकारद्वयीने स्वरसाज चढवला आहे. नुकत्याच प्रदर्शित होऊन गेलेल्या ‘एक होतं पाणी’ चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन सातघरे या ‘म्युझिक व्हिडिओ’चे दिग्दर्शन करीत असून, योगेश अंधारे यांनी चित्रीकरणाची जबाबदारी सांभाळली आहे. स्वप्नील जाधव संकलकाची भूमिका पार पाडत असून, मार्केटिंगची जबाबदारी रियाझ बलोच यांनी सांभाळली आहे.

अपूर्वा कवडे‘फंडूगिरी’मध्ये अपूर्वा कवडे ही अभिनेत्री आहे. अपूर्वा कवडेने अभिनय केलेल्या ‘चिंध्या’ नावाच्या लघुपटाला २०१७मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी नामांकन मिळाले होते. तिने नुकताच एक हिंदी चित्रपटही केलाय. ‘शुभरात्री’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिका करीत असून, त्यात तिच्यासोबत मेहुल गांधी व शाहीद मल्ल्या आहेत. वर्षा उसगावकर व अनुपसिंग ठाकूर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने काम केले आहे. अपूर्वा उत्तम नृत्यांगनासुद्धा आहे. गणेश आचार्य यांच्याकडे तिने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल आहे. नुकताच तिने ‘सोनिया रांझणा’ हा हिंदी म्युझिक अल्बम केला असून, त्यात तिचा अभिनय, नृत्य यांचा संगम बघायला मिळतो.

अपूर्वा कवडे या मराठमोळ्या अभिनेत्रीचा अभिनय असलेला, सुप्रसिद्ध गायिका रेश्मा सोनावणेचा अनोखा आवाज लाभलेला व रोहन सातघरे यांचे दिग्दर्शन असलेला ‘फंडूगिरी’ हा म्युझिक व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language