Ad will apear here
Next
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद
अभिषेक देशपांडे

पुणे : इटलीतील सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महोत्सवात पुण्याच्या अभिषेक देशपांडेने सात गुणांची कमाई करीत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत ‘ब’ गटात खेळताना अभिषेक देशपांडेने नऊ डावांत सात गुण मिळवले. गुणांची बरोबरी झाल्याने अभिषेकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत अभिषेकने अग्रमानांकित फिडे मास्टर व्हॅलन्टी व जाइल्स (फ्रान्स) या अनुभवी खेळाडूंवर मात केली. 

महत्त्वाच्या डावांमध्ये अभिषेकने अॅलबिनी फेडरिको व माँड्युकी मिरको यांच्यावर विजय नोंदवत आगेकूच केली होती. सात गुणांसह त्याने उपविजेतेपद संपादन केले. इटलीतील दुसऱ्या क्वीन ऑफ कॅटोलिका बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेकने आठवे स्थान मिळवले. तसेच त्याने फिडे मास्टर पालोझ्झा ख्रिस्तियन, व्ही. अॅटिंनो यांना पराभूत केले. या कामगिरीमुळे त्याने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला. 


जर्मनीतील खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेने सहावे स्थान मिळवले होते. या स्पर्धेत तो ग्रँडमास्टरच्या गटात खेळला होता. या स्पर्धेत त्याने ऑस्ट्रियाच्या स्पाइसबर्गर गेहार्ड व युक्रेनच्या केमेनस्की डिमॅट्रो यांना नमवले होते. अभिषेकच्या या विजयाबद्दल सन्मानचिन्ह देऊन त्याला गौरविण्यात आले.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language