Ad will apear here
Next
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे २९ सप्टेंबरला उद्घाटन
नवदुर्गांच्या हस्ते होणार शुभारंभ
पुणे नवरात्रौ महोत्सवाची माहिती देताना आयोजक-अध्यक्ष आबा बागुल

पुणे : ‘कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाफ असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सांस्कृतिक पुण्याच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन यंदा विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांच्या हस्ते रविवार, २९ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी ४.३० वाजता गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे होणार आहे,’ अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनःश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, सदस्य रमेश भंडारी, अमित बागुल आणि पदाधिकारी उपस्थित होते.

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता पुणतांबेकर, निर्मला कांदळगावकर, शिक्षणतज्ज्ञ आबेदा इनामदार, उद्योजिका गायत्री छाब्रिया, भारती बऱ्हाटे, काव्या लडकत, पौर्णिमा लुनावत, डॉ. समिता मुलानी या नवदुर्गांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून, सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार असणार आहेत. दर वर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्याठ नामवंतांना ‘श्री लक्ष्मीमाता कला-संस्कृती जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून, यात अर्थतज्ज्ञ विद्याधर अनास्कर, उद्योजक शंतनू देशपांडे, सांस्कृतिक व सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र किराड, लावणी सम्राज्ञी मानसी मुसळे, वैद्यक क्षेत्रातील डॉ. संजीव खुर्द यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध घटकांतील २५ व्यक्तींचा सन्मान या महोत्सवात केला जाणार आहे,’ असेही बागुल यांनी सांगितले. 

‘यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने आमच्यासाठी हा महोत्सव अधिक आनंद देणारा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची यंदा १५० वी जयंती असल्याने हा महोत्सव त्यांना समर्पित करत आहोत. उद्घाटन सोहळ्यानंतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले, गिरीजा प्रभू, वैष्णवी पाटील, शर्वरी जमेनीस, सायली पराडकर, ऐश्वर्या काळे, दीपाली सय्यद, स्मिता शेवाळे, स्मिता तांबे यांचे बहारदार फ्युजन सादरीकरण होणार आहे. त्याशिवाय रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी विशेष लावणी महोत्सव होणार असून, ते यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे. सलग दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत. गेली २५ वर्ष हा नवरात्राच्या काळातील हा दहा दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे,’ असेही आबा बागुल यांनी या वेळी स्पष्ट केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi