Ad will apear here
Next
‘बार्बेक्यू नेशन’तर्फे महिला दिन साजरा
महिलांसाठी सवलतीच्या दरात खास मेन्यू
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मॉल्स, हॉटेल्स, खरेदीची ठिकाणे अशा अनेक ठिकाणी खास सवलती देण्यात आल्या होत्या. ‘बार्बेक्यू नेशन’ या आघाडीच्या रेस्टॉरंटतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांसाठी खास मेन्यू विशेष सवलतीच्या दरात सादर करण्यात आला होता. मोठ्या संख्येने महिलांनी याचा लाभ घेतला. 

महिला दिनानिमित्त खास मॉकटेल्ससह कॉकटेल पोटॅटो, एक्झॉटिक व्हेज, मियामी मशरूम,मेक्सिकन व्हेज फजीताज, बार्बेक्यू फ्रुट्स असा शाकाहारी मेन्यू तयार करण्यात आला होता, तर मांसाहारी मेन्यूमध्ये अफगाणी चिकन, बेटमॅक्स ड्रमस्टीक हे नाविन्यपूर्ण पदार्थ समाविष्ट करण्यात आले होते. डेझर्टमध्ये तिरामात्सू, मिक्स्ड फ्रुट टार्ट, कसाटा पेस्ट्री, जिलेबी आणि बालुशाही अशी पक्वानांची रेलचेल होती. याशिवाय खास केकही देण्यात येत होता. महिला दिनानिमित्त विशेष भेट म्हणून ‘शेअर ए हॅपिनेस कार्ड’ही देण्यात आले. त्यामुळे महिला दिन अगदी विशेष ठरल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली. 

‘बार्बेक्यू नेशन’ उत्तम बार्बेक्यू पदार्थांसाठी लोकप्रिय आहेच;पण महिला दिनानिमित्त महिलांना दिलेल्या अगत्यपूर्ण सेवेमुळे विशेष कौतुक वाटल्याची भावनाही महिलांनी व्यक्त केली.  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language