Ad will apear here
Next
पारिवली येथे राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी
भिवंडी : तालुक्यातील पारिवली येथे परिसरातील युवकांनी एकत्र येत २६ जूनला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४५वी जयंती साजरी केली. 

या वेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ‘शाहू महाराज आणि त्यांनी अंधश्रद्धेचा केलेला बिमोड’ यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा सचिव गणेश शेलार यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणेचा, विचारांचा, तसेच त्यांच्या एकूणच जीवन प्रवासाचा आढावा घेत शिक्षक विनायक जाधव, सुजय जाधव, रवी कांबळे, प्रशांत गायकवाड, श्वेता भालेराव आणि अक्षय भोईर यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित जाधव यांनी केले. सुरज खरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील भोईर, रोहित जाधव, सुरज खरे, अक्षय गायकवाड, अक्षय भोईर व  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भिवंडी शाखेतर्फे करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, महाराष्ट्र ‘अंनिस’चे कार्यकर्ते, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या चळवळीत काम करणारे तरुण, तरुणी तसेच पारिवली गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language