Ad will apear here
Next
‘डिझाइन डेक्को कनेक्शन्स’तर्फे पुण्यात मास्टर क्लासेस
पुणे : डिझाइन डेक्को या गोदरेज समूहाच्या व्यासपीठातर्फे डिझाइन प्रेमी आणि व्यावसायिकांना एकाच छताखाली आणण्यासाठी मास्टर क्लासेसचे आयोजन केले आहे. २६ मे २०१९ रोजी दुपारी १२ ते पाच या वेळेत हे क्लासेस आणि विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

या क्लासमध्ये या क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश असणार आहे. या मास्टर क्लासेसमध्ये घर सजावटीच्य टिप्स, स्मार्ट आणि सुरक्षित घरे उभारणे व घरगुती सजावटीची सहनिर्मिती करणे या विषयांची माहिती घेतली जाणार आहे. ही सत्रे ‘डिझाइन डेक्को २०१९’च्या ‘टेक्नॉलॉजी शेपिंग फ्युचर रेडी लिव्हिंग स्पेसेस’ या संकल्पनेवर आधारित आहेत.

दुपारी १२ ते सायंकाळी पाच या वेळेत होणाऱ्या मास्टर क्लासेसमध्ये दुपारी दोन ते तीन या वेळेत आर्किटेक्ट कल्पक शाह ‘घर सजावटीच्या टिप्स आणि ट्रिक्स स्टुडिओ कोर्स’ याबद्दल माहिती देतील. दुपारी तीन ते चार या वेळेत ‘स्मार्ट आणि सुरक्षित घर उभारणीच्या युक्ती’ यावर मार्गदर्शन केले जाईल. १२ ते संध्याकाळी पाच या वेळेत ‘यू अँड यूसह स्पीड डेटिंग’, गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सतर्फे संवाद विभाग आणि गोदरेज प्रॉपर्टीजद्वारे सोपी सुरुवात यांवर आधारित सत्रे होतील. 

कार्यक्रमाविषयी :
दिवस : रविवार, २६ मे २०१९
वेळ : दुपारी १२ ते सायंकाळी पाच  
स्थळ : गोदरेज रेज्युवे, सर्वे क्र. ९ ते १४, रेणुका माता मंदिरजवळ केशवनगर, मुंधवा, पुणे, महाराष्ट्र ४११ ०३६ 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language