Ad will apear here
Next
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे टाटा पॉवरचा गौरव
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांची दखल

मुंबई/पुणे : टाटा पॉवर या भारतातील सर्वांत मोठ्या एकात्मिक वीज कंपनीचा महाराष्ट्र सरकारच्या व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (टीपीसीडीटी) या आपल्या सीएसआर विभागाच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांबद्दल हा सत्कार करण्यात आला.

टाटा पॉवरच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स व सस्टेनिबिलिटी विभागाच्या प्रमुख तसेच कार्यकारी विश्वस्त (टीपीसीडीटी) शालिनी सिंग यांनी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या एका समारंभात कंपनीतर्फे हा सत्कार स्वीकारला. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री संभाजी निलंगेकर, कौशल्य विकास व उद्यमशीलता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, राज्य सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि महाराष्ट्र व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अनिल जाधव यांच्यासह अनेक सरकारी अधिकारी, आयटीआयमधील अध्यापक आणि उद्योगजगतातील सहयोगी या समारंभाला उपस्थित होते.
 
या वेळी बोलताना शालिनी सिंग म्हणाल्या, ‘कौशल्य विकासाच्या क्षेत्रातील टाटा पॉवरच्या प्रयत्नांमागील मोठे उद्दिष्ट बहुगुणित आहे. एक म्हणजे यामुळे देशातील ऊर्जाक्षेत्राच्या मागण्या पूर्ण करणारी कौशल्ये अंगी असलेल्या मनुष्यबळाचा मोठा संचय निर्माण होतो; दुसरे म्हणजे सतत बदलत असलेल्या मनुष्यबळ बाजारपेठेत स्वत:ला टिकवून धरण्याच्या संधी यामुळे तरुणांना मिळतात आणि त्यायोगे त्यांचे राहणीमान सुधारू शकते; तसेच राष्ट्रबांधणीसाठी लोकसंख्येच्या एका मोठ्या वर्गातील क्षमता जोपासल्या जातात. आमच्या या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत.’  


महाराष्ट्र सरकारचे व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच कौशल्यविकास व उद्यमशीलता खात्याच्या अखत्यारीतील सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पाखाली टाटा पॉवरने आयटीआय जवाहरशी (पालघर जिल्हा) सहयोग केला आहे. आदिवासी तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांची कौशल्ये व शिक्षणाच्या अद्ययावतीकरणासाठी हा सहयोग करण्यात आला आहे. तरुणांना त्यांच्या कमाल क्षमतेएवढी औद्योगिक कौशल्ये साध्य करण्यात, तसेच ऊर्जा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरजांच्या पूर्ततेत मदत करण्यासाठी सध्या सार्वजनिक-खासगी भागीदारीखाली चाललेल्या प्रयत्नांना आणखी जोर देणे हे या सहयोगामागील धोरणात्मक उद्दिष्ट आहे.

टाटा पॉवरने सॉफ्ट स्किल्स कोर्सेस, मोटर मेकॅनिक लॅब विकास, तसेच आपल्या कर्मचारी स्वयंसेवकांमार्फत  मेंटॉरिंग साह्य या सुविधाही देऊ केल्या आहेत. याशिवाय, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मुंबईतील ‘टीपीएसडीआय’ लघुकालीन कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधीही देण्यात आली आहे. यामध्ये सिम्युलेशनवर आधारित उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे शिक्षण घेता येईल. 

विद्यार्थ्यांचे अध्ययन सुधारण्यात, तसेच त्यांना रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी मिळण्यातही हे सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना कर्मचारी स्वयंसेवकांनी आयटीआय जवाहरमध्ये प्री-प्लेसमेंट कोचिंगही दिले होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi