Ad will apear here
Next
दुबईत ‘क्रेडाई’चा इंडियन प्रॉपर्टी शो
डावीकडून :- अरबाझ खान,गीतांबर गेरा,लैंड डिपार्टमेंट के डायरेक्टर जनरल सुल्तान बट्टी बिन मजरेन,जक्षय शाह,विपुल ठक्कर,कपिल गांधीपुणे : रेरा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता, समानता आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून, यात अनिवासी भारतीयांचाही (एनआरआय) समावेश आहे. या उत्साहाच्या वातावरणात दुबई येथे सात ते नऊ  डिसेंबर या कालावधीत झालेल्या क्रेडाईच्या ‘इंडियन प्रॉपर्टी शो’ला मोठ्या संख्येने लोकांचा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात झालेली चौकशी आणि नोंदविलेले व्यवहार यातून उत्साहित भावनेचे प्रतिबिंब बघायला मिळाले. महाराष्ट्राला प्रचंड संख्येने प्रतिसाद मिळाला, तर कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळलाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

"प्रदर्शनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्याचे पाहून, आम्हाला खरोखर प्रोत्साहन मिळाले आहे. शोच्या तीन दिवसातच हजारो प्रॉपर्टी खरेदीदारांनी प्रदर्शनात गर्दी केली. तसेच क्रेडाई महाराष्ट्रानेच विविध मालमत्तांच्या संदर्भांत मोठ्या संख्येने चौकशांची नोंदणी केली आहे," असे  ‘क्रेडाई नॅशनल’चे कार्यकारी समिती सदस्य कपिल गांधी या प्रचंड प्रतिसादाबद्दल भाष्य करताना म्हणाले.

भारतीय मालमत्तांच्या क्रेडाईच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारतातील दोनशे पेक्षा अधिक रेरा मान्यताप्राप्त, प्रतिष्ठित बिल्डर्सचा समावेश होता. यात राज्यवार १४ दालने होती. त्यात ६०  शहरांमधील हजारो मालमत्तांचे प्रदर्शन दाखवण्यात आले. प्रदर्शनातील राज्यवार दालनांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली -एनसीआर, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गोवा यांचा समावेश होता.
खरेदीदारांना शिक्षित करणे, मार्गदर्शन करणे आणि माहिती देणे हा या प्रदर्शनाचा हेतू होता. यात भारतातील सध्याचा मालमत्ताविषयक ट्रेंड या विषयावर मालमत्तातज्ज्ञांचे विनामूल्य सेमिनार, भारतातील स्थावर मालमत्तेच्या गुंतवणुकीच्या कायदेशीर बाबी तसेच, वास्तु व इंटेरियर सेमिनार यांचाही समावेश होता.

‘क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांच्या सेमिनारमध्ये त्यांनी रेरा, मालमत्ता खरेदीदारांवर त्याचा परिणाम, महत्त्वाच्या तरतुदी आणि ठळक वैशिष्ट्ये या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन राजे दुबई भूमी विभागाचे महासंचालक सुल्तान बट्टी बिन मजरेन, दुबईतील भारताचे वाणिज्य राजदूत विपुल,  एनआरआय फोरम कर्नाटकच्या उपाध्यक्षा डॉ. आरती कृष्णा आणि बॉलिवूड अभिनेता, भारतीय प्रॉपर्टीचे ब्रँड अॅम्बेसेडर अरबाज खान यांनी केले. यावेळी क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शाह,  क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद,   क्रेडाईचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन अध्यक्ष विपुल ठक्कर, क्रेडाई नॅशनलचे चिटणीस रोहित मोदी, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया, क्रेडाई नॅशनल युथ विंगचे संयोजक आदित्य जावडेकर आणि क्रेडाईचे अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 
 
या प्रदर्शनादरम्यान, क्रेडाईने स्मार्ट इंडिया स्थावर मालमत्ता परिषद आणि संयुक्त अरब अमिरात व भारतातील अग्रगण्य विकसक आणि शासकीय संस्थांना पुरस्कृत करण्यासाठी पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. परिषदेत आणि पुरस्कार समारंभात एकत्र येऊन बँका, दुबई भूमी विभाग आणि युएई चॅनल पार्टनरनी आपला पाठिंबा दर्शविला. संयुक्त अरब अमिरातीत स्थायिक झालेले शेकडो एनआरआय या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीत त्यांनी प्रचंड रस दाखविला.

‘एनआरआय’ना येणाऱ्या विविध मालमत्ताविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी क्रेडाईच्या इंडियन प्रॉपर्टी शोमधे ग्राहक तक्रार निवारण मंचही होता. या मंचाने अभ्यागतांना क्रेडाई सदस्य विकसकांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले; जेणेकरून कोणत्याही अनैतिक पद्धतींपासून ग्राहक हक्कांचे प्रभावीपणे संरक्षण व्हावे.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language