Ad will apear here
Next
अभ्यंकर बालकमंदिरात बालवारकऱ्यांची दिंडी


रत्नागिरी :
‘विठ्ठल विठ्ठल गजर करू या, आली आली एकादशी, चला जाऊ पंढरीसी, माऊली माऊली’ असा जयघोष गुरुवारी (११ जुलै) रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिरात ऐकू येत होता. 



शुक्रवारी असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त शाळेत बालवारकरी अवतरले होते. हिंदू संस्कृतीमधील सण-उत्सवांची माहिती लहानपणापासून मुलांना कळण्याकरिता शाळेत असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. या वेळी बालकांनी विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची वेशभूषा केली होती. 



विठ्ठल नामाच्या गजरात खेळघर, तसेच छोट्या व मोठ्या गटातील मुलांनी दिंडीचा अनुभव घेतला. मुख्याध्यापिका मीना रिसबूड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 



 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language