Ad will apear here
Next
‘आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजून घ्यायला हवे’
उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ यांचे प्रतिपादन


औंध : यांत्रिकीकरणाचा मानवी जीवनावर चांगला परिणाम झाला तसाच वाईट परिणामसुद्धा झालेला दिसतो. आधुनिक काळात आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व आपण समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ यांनी केले.

महाविद्यालयात ‘आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी भूषविले. या वेळी डॉ. सविता पाटील, प्रा. सायली गोसावी, प्रा. हर्षकुमार घळके, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.डॉ. सदाफळ म्हणाले, ‘भोपाळला  या ठिकाणी वायुगळती झाल्याने अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला. त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजले असते, तर त्यांचा जीव वाचू शकला असता. ज्यावेळी वायुगळती होते त्यावेळी पाण्याने ओला केलेला रुमाल नाकाला लावावा. तसेच वायुगळतीच्या आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जायला हवे. असे केल्याने आपल्यावरील आपत्ती टळू शकते.’

‘नैसर्गिक आपत्तीची सर्वप्रथम चाहूल प्राण्यांना लागते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करताना आपण प्राण्यांच्या हालचाली ओळखायला पाहिजेत. हवामानात होणारे बदल वेळीच हवामान खात्याला समजले, तर शेतकऱ्यावर येणारी आपत्ती टाळता येऊ शकते. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आपत्ती येण्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन करायला हवे. महापूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झालेली दिसते. पुरात सापडलेल्या व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी पोहचवायला पाहिजे. त्यानंतर त्यांच्यावर औषध उपचार करायला हवा. तत्यच्प्रमाणे त्यांचे पुनर्वसन करायला पाहिजे,’ अशी माहिती डॉ. सदाफळ यांनी दिली.प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘आपण आपत्तीची वाट न पाहता अगोदरच आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व लक्षात घेतले तर कमीतकमी प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घ्यावे.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे चेअरमन प्रा. प्रदीप भिसे करून दिली. डॉ. तानाजी हातेकर यांनी आभार मानले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language