Ad will apear here
Next
टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे ‘जीएसटी’ अभ्यासक्रम
टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या ‘जीएसटी’ अभ्यासक्रमाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना (डावीकडून) अनिरुद्ध चव्हाण, विलास आहेरकर, नरेंद्र सोनावणे, नवनीत बोरा व शरद सूर्यवंशी.

पुणे : ‘दि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे (डब्ल्यूएमटीपीए) वस्तू व सेवा कर (जीएसटी) या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. हा अभ्यासक्रम दोन महिन्यांचा असून, त्याची सुरुवात आठ डिसेंबर २०१८ पासून होत आहे’, अशी माहिती असोसिएशनचे मुख्य संयोजक व माजी अध्यक्ष नरेंद्र सोनावणे, अध्यक्ष नवनीतलाल बोरा, शरद सूर्यवंशी, विलास आहेरकर, अनिरुद्ध चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘करप्रणाली अधिक सुकर व्हावी, याकरिता असोसिएशनतर्फे सवलतीच्या दरात महसूल कायद्याच्या जागृतीसाठी नियमित अभ्यासक्रम चालवले जातात. गेल्या वर्षीपासून जीएसटी कायदा लागू झाला असून, हा कायदा नवीन असल्याने सर्वांनाच यामध्ये असंख्य अडचणी येत आहेत. त्यामुळेच वारंवार या कायद्यात शासनाकडून बदल होत आहेत. या कायद्याविषयी माहिती व्हावी, यासाठी हा अभ्यासक्रम महत्वाचा ठरणार आहे’, असे नरेंद्र सोनावणे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘डब्ल्यूएमटीपीए’ ही संस्था १९५० पासून कार्यरत असून, आज संस्थेचे महाराष्ट्राच्या पश्चिम विभागात १२०० पेक्षा अधिक सभासद आहेत. कर सल्लागार, वकील, सीए, कंपनी सेक्रेटरी आदींचा समावेश आहे. हा एक वेगळा आणि महत्त्वाचा असा अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये आम्ही महसूल कायद्यातील कर रचनेविषयी मार्गदर्शन करतो. हे या अभ्यासक्रमाचे १२ वे वर्ष आहे. हा अभ्यासक्रम करून कार्यरत असलेले एक हजारपेक्षा जास्त कर सल्लागार आहेत. सध्या जीएसटी कायद्यामुळे अनेकजण संभ्रमात आहेत. हा संभ्रम दूर  करण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्वाचा ठरणार आहे. जीएसटी कायद्यातील सर्व तरतुदींचा अभ्यास या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला असून, तीस वर्षांपेक्षा अधिक जास्त अनुभव असलेल्या तज्ज्ञांना यासाठी बोलावले जात आहे.’

‘दोन महिन्यांचा हा अभ्यासक्रम असून, शनिवारी व रविवारी सकाळी नऊ ते एक या वेळेत संस्थेच्या शिवाजी रस्त्यावरील यादव व्यापार भवन या इमारतीतील सभागृहात याचे वर्ग होतील. त्यामध्ये कर सल्लागार, सीए, वकील, सीएस मार्गदर्शन करतील. जीएसटी कायदा, लेखापालन, प्राप्तिकर, ऑडिट, प्रोफेशनल टॅक्स, बँकिंग यासह मूलतत्त्वे यावरही मार्गदर्शन केले जाणार आहे. अभ्यासक्रमाच्या शेवटी परीक्षा घेऊन प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी ०२०-२४४७०२३७ या क्रमांकावर किंवा www.thewmtpa.org या संकेस्थळावर भेट द्यावी’, असे नवनीत बोरा यांनी सांगितले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language