Ad will apear here
Next
वस्तू हरवल्याची तक्रार ऑनलाइन
पुणे : तुमची महत्त्वाची कागदपत्रे जर हरवली असतील अथवा चोरीला गेली असतील तर त्याची तक्रार आता तुम्ही ऑनलाइन नोंदवू शकता. पुणे पोलिसांनी यासाठी आता एक विशेष पोर्टल तयार केले आहे. 

‘पुणे पोलीस – लॉस्ट/फाउंड आर्टिकल रिपोर्ट सिस्टीम’ अशा नावाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर सरकारी कामांची महत्त्वाची कागदपत्रे हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास त्या संदर्भातील तक्रार या पोर्टलवर नोंदवली जाऊ शकते. 

त्याबरोबरच इतर कोणाची अशी कागदपत्रे सापडली असतील तर ती जमा करण्यासाठीची माहितीही तुम्ही या पोर्टलवर देऊ शकता. त्यासाठी ‘लॉस्ट आर्टिकल रिपोर्ट’ आणि ‘फाउंड आर्टिकल रिपोर्ट’ अशा दोन प्रकारच्या स्वतंत्र विंडोज या पोर्टलवर उपलब्ध आहेत. प्रथमदर्शनी हा रिपोर्ट नोंदवणाऱ्या व्यक्तीने आपला मोबाइल क्रमांक नोंदवून या प्रक्रियेस सुरुवात करण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे.

वेबसाइट : https://punepolice.co.in/lost-found/

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi