Ad will apear here
Next
‘भारत फोर्ज’मध्ये रक्तदान शिबीर
पुणे : भारत फोर्ज लिमिटेड कंपनीचे चेअरमन बाबासाहेब कल्याणी यांच्या वाढदिवसानिमित्त भारत फोर्ज कामगार कल्याण निधीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण एक हजार १२० जणांनी रक्तदान केले.

कंपनीच्या मुंढवा, सातारा, चाकण व कल्याणी सेंटर फॉर टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशन (केशवनगर) येथील कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. ससून हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल आणि पुना ब्लड बँक यांना या वेळी आमंत्रित करण्यात आले होते.

सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजित करण्यात येत असलेल्या या शिबिराचे हे सहावे वर्ष आहे. कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अमित कल्याणी व राजू कल्याणी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अभिजित शहा, जितेंद्र येरूडकर, प्रशांत ढवळे, कामगार संघाचे अध्यक्ष दिलीप जामदार, जनरल सेक्रेटरी संतोष साबळे, कामगार कल्याण निधीचे जनरल सेक्रेटरी संतोषकुमार बिरादार उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language