Ad will apear here
Next
मराठा चेंबरतर्फे इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन
पुणे : ‘जर्मन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे पुण्यात (एमसीसीआयए) एक दिवसीय इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची संकल्पना कोलॅबोरेट टू इनोव्हेट असून, हॉटेल शेरटन ग्रँड येथे गुरूवार, सहा डिसेंबर २०१८ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत ही परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये धोरणकर्ते, उद्योगातील नेतृत्व, शिक्षणतज्ञ, लघु व मध्यम उद्योगातील प्रतिनिधी, इनक्युबेटर क्षेत्रातील तज्ज्ञ हे एकाच व्यासपीठावर येऊन या संकल्पनेविषयी चर्चा करतील’, अशी माहिती एमसीसीआयएचे सरसंचालक प्रशांत गिरबाने यांनी दिली.  

ते पुढे  म्हणाले, ‘विविध व्यावसायिक, उद्योगसंस्था आणि एसएमई यांना आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी व योजनाबद्धरित्या प्रगती करण्यासाठी वित्त, संशोधन व शैक्षणिक संस्था यांच्यासोबत सहकार्य वाढविणे हा इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचा मुख्य उद्देश आहे. या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून एसएमई व कार्पोरेट क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विविध संशोधन संस्था/इनक्युबेशन सेल्स, सरकारी पातळीवर घेण्यात येणारे पुढाकार, धोरणे,एसएमईजची क्षमता वाढविणे व  नावीन्यपूर्ण पध्दतींचे अंगीकरण करणे यावर भर दिला जाईल. यामध्ये उद्योगसंस्था, एसएमई आणि शैक्षणिक संस्थांमधून दोनशे प्रतिनिधी सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.’

‘या परिषदेचे उद्घाटन केंद्र सरकारच्या लघु व मध्यम उद्योगमंत्रालयातील सहविकास आयुक्त मनदीप कौर यांच्या हस्ते होणार असून, याप्रसंगी जीआयझेड इंडियाच्या प्रायव्हेट सेक्टर विभागाचे संचालक नूर नक्सबांदी, जीआयझेडच्या एमएसएमई इनोव्हेशन प्रोजेक्ट विभागाचे संचालक चमनलाल धांडा,एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा उपस्थित असतील’, असेही गिरबाने यांनी सांगितले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language