Ad will apear here
Next
भारतातील पहिली अलायर यंत्रणा नवी मुंबईत सुरू
गंभीर दम्‍याने त्रस्त रुग्णांना दिलासा

ठाणे : दम्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आता आशेचा मोठा किरण नवी दिसून आला आहे. वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये ब्रोन्कीयल थर्मोप्लास्टी उपचार देण्यासाठी अलायर यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. रेस्पीरेटरी मेडिसिन व इंटरवेन्शल पल्मनोलॉजीस्टचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत छाजेड यांच्यासह वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलचे फॅसिलीटी डायरेक्टर संदीप गुदुरू यांनी या यंत्रणेचे उद्घाटन केले.

‘आम्‍हाला ब्रोन्कियल थर्मोप्‍लास्‍टी यंत्रणा खरेदी केलेले पश्चिम भारतातील पहिले हॉस्पिटल असण्‍याचा आनंद होत असून, ही यंत्रणा गंभीर दम्‍याने पिडीत असलेल्‍या रुग्‍णांना साह्य करेल,’ असा विश्वास फोर्टिस हॉस्पिटलचे फॅसिलिटी डायरेक्‍टर संदीप गुदुरू यांनी या प्रसंगी व्यक्त केला. 

भारतीय प्रौढ व्‍यक्‍तींमध्‍ये दम्‍याचे प्रमाण दोन टक्‍के आहे आणि जवळपास दोन दशलक्ष भारतीय प्रौढ व्‍यक्‍ती गंभीर दम्‍यापासून पिडीत असल्‍याचा अंदाज आहे. दम्‍यावर नियंत्रण न राहण्‍यासाठी जबाबदार असलेले घटक ओळखून त्‍यानुसार उपचार करण्‍यासाठी गंभीर दम्‍याने पिडीत असलेल्‍या रुग्‍णांची सखोल तपासणी केली जाते. त्‍यानंतर अशा रुग्‍णांवर ब्रोन्कियल थर्मोप्‍लास्‍टी केली जाते. ही प्रक्रिया ब्रोन्कियल स्‍नायू आंकुचित करून दमा नियंत्रण सुधारण्‍यासाठी रेडिओ फ्रिक्‍वेन्‍सी नियंत्रित ऊर्जेचा वापर करते. ही प्रक्रिया दोन ते तीन आठवड्यांमध्‍ये तीन वेगवेगळ्या सत्रांमध्‍ये तोंडावाटे किंवा नाकावाटे टाकल्‍या जाणाऱ्या ब्रोन्‍कोस्‍कोपच्‍या माध्‍यमातून केली जाते. अलायर यंत्रणेच्‍या माध्‍यमातून अतिरिक्‍त श्‍वसन स्‍नायू ऊतींवर सौम्‍य उष्‍णतेचा मारा दिला जातो. ब्रोन्कियल थर्मोप्‍लास्‍टी उपचार होत असताना इनहेलर्स आणि इतर औषधांचीदेखील गरज भासते; पण त्‍यांचे डोसेज आणि वापर आवश्‍यकतेनुसार कमी करता येऊ शकतात. प्रक्रियेनंतर काही दम्‍याचे झटके येऊ शकतात. त्‍यासाठी काही दिवस हॉस्पिटलमध्‍ये राहावे लागू शकते. काहीजण आपापल्‍या दैनंदिन कामांवर रुजूदेखील होऊ शकतात.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi