Ad will apear here
Next
‘ट्रॅव्हलयारी’ अॅप सात भारतीय भाषांमध्ये उपलब्ध
मुंबई : भारताचा आघाडीचा ऑनलाइन बस बुकिंग मंच ‘ट्रॅव्हलयारी’ने नुकतेच आपले अँड्रॉइड अॅप सादर केले असून, ते इंग्रजी, हिंदी, गुजराती, कानडी, मराठी, पंजाबी आणि तामिळ सात भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. देशभरातून हे अॅप वापरू लागलेल्या टियर टू आणि थ्री शहरांतील वाढत्या संख्येचा विचार करून हे पाऊल उचलले आहे.

‘ट्रॅव्हलयारी’चे सह-संस्थापक आणि संचालक ऑरविंद लामा म्हणाले, ‘ट्रॅव्हलयारी हा भारतीयांचा, भारतीयांनी भारतातच तयार केलेला ब्रॅंड असल्याने, भारतीय वापरकर्त्यांची वैविध्याची आणि स्थानिकीकरणाची गरज भागवणे हे साहजिकच आमचे पुढचे पाऊल होते. बसने प्रवास करणाऱ्या व भारतीय भाषा वापरणाऱ्या हौशी प्रवाशांच्या मोठ्या समूहाला सेवा देण्याच्या दिशेने हे आमचे पहिले पाऊल आहे.’

‘संपूर्ण चॅनल आणि डिव्हाइस मंचांमध्ये संपूर्ण डायनॅमिक स्थानिक अनुभव जोडून या स्थानिकीकरण क्षमता आणखी सुधारण्याची आमची योजना आहे. नेहमी ग्राहक-केंद्री संस्था बनण्याकडे ‘ट्रॅव्हलयारी’चा कल असतो आणि संपूर्ण भारतातील आमच्या ग्राहक बेसला अधिक चांगली सेवा देण्यासाठी बहुभाषी वैशिष्ट्य सादर करणे स्वाभाविक होते,’ असे लामा यांनी सांगितले.

ट्रॅव्हल असिस्टंसच्या क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल सोल्युशन्स सादर करणाऱ्यांमध्ये ‘ट्रॅव्हलयारी’ आघाडीवर असून, याद्वारे बस ट्रॅकिंग टेक्नॉलॉजीसारखी सेवा प्रदान केली जाते, ज्यामुळे वेळेवर आगमन होण्यातील अनियमितता व यांसारख्या इतर अनियमित प्रक्रिया ओळखण्याची क्षमता वाढते. सॉफ्टवेअर आधारित ऑपरेशन्स सक्रिय करून ‘ट्रॅव्हलयारी’ने ऑपरेटर आणि प्रवासी या दोघांसाठी प्रवास अधिक आटोपशीर, विश्वसनीय आणि आनंददायक केला आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language