Ad will apear here
Next
फिनोलेक्स अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये दुसरा क्रमांक


रत्नागिरी :
रत्नागिरीच्या फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांच्या टीमने भारत फॉर्म्युला नॅशनल कार्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ‘टीम मॅटाडोअर्स’ असे या टीमचे नाव असून, राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. 

१० ते १३ सप्टेंबर २०१९दरम्यान कोइमतूर (तमिळनाडू) येथे ही स्पर्धा झाली. या रेसिंग चॅम्पियनशिपला फॉर्म्युला वन रेसिंगचे बेसिक मॉडेल म्हणून ओळखले जाते. गाड्यांची गुणवत्ता त्यांची डिझाइन्स, ब्रेक टेस्ट, अॅडक्सलरेशन टेस्ट, स्किडपॅड, एन्ड्युरन्स, ड्रॅग रेस अशा वेगवेगळ्या स्टॅटिक आणि डायनॅमिक चाचण्यांद्वारे तपासण्यात येते. फिनोलेक्स अॅककॅडमीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली इलेक्ट्रिक कार्ट उत्तम अॅस्थेटिक, अर्गोनॉमिक्स व ड्रायव्हर स्किल्स यामुळे सर्वांचे आकर्षण ठरली. ही कार्ट स्किड पॅड आणि ऑटोक्रॉस या फेऱ्यांमध्ये अव्वल ठरली. तसेच या यशाबद्दल टीम मॅटाडोअर्सला सुमारे ३८ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेमध्ये भारतातून अनेक संघांनी सहभाग घेतला होता. ही रेसिंग कार्ट बनविण्यासाठी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद किरकिरे, डॉ. मिलिंद यादव, टीमचे फॅकल्टी अॅडव्हायझर प्रा. व्ही. मुरली मोहन व प्रा. अमर येकणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच राजेश भोसले, राजेंद्र उत्तेकर, अविनाश लिंगायात, दीपक मेस्त्री यांनी ही कार्ट बनवण्यात सहकार्य केले.

ही कार्ट बनवण्यासाठी टीम कॅप्टन प्रथमेश राहाटे, टीम उपकॅप्टन कुशल चौधरी, आविष्कार बोंद्रे, कुणाल पाटील, साहिल बंडबे, प्रणल तार्ये, अनिकेत परब, राहुल पड्याळ यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. 

या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी टीमचे अभिनंदन केले आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi