Ad will apear here
Next
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील अल्पमुदत अभ्यासक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. विजय खरे. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे, डॉ. सविता पाटील यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

पुणे : औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याचे उद्घाटन नुकतेच कार्यक्रमाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता आणि आंतरराष्ट्रीय केंद्राचे डायरेक्टर डॉ. विजय खरे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. 

डॉ. खरे म्हणाले, ‘विद्यार्थी हे राष्ट्राची संपत्ती आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास झाल्यास समाजाचा आणि देशाचा विकास होईल. विद्यार्थ्याने पारंपरिक शिक्षणाबरोबरच एखादे कौशल्य आत्मसात करायला हवे. आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःचा उदरनिर्वाह करण्याबरोबरच समाजाचा आणि देशाचा विकास करायला हवा. तरुण मुलांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा आणि वारसा घेऊन वाटचाल केली पाहिजे.’


मेनकुदळे म्हणाले, ‘बुद्धीच्या सामर्थ्यावर माणसाने आजपर्यंत प्रगती केली असून, जगाच्या पाठीवर आपली वेगळी ओळख माणसाने निर्माण केली आहे. विद्यार्थ्याने आपल्यातील गुणवत्ता ओळखून उंच भरारी घ्यावी. जागतिकीकरणाने समाजात स्पर्धा निर्माण झाली असून,  विद्यार्थ्याला आयुष्यात सक्षमपणे उभे राहता यावे यासाठी ज्ञानाची ताकद देणे गरजेचे आहे. हे बळ देण्याचे काम या शॉर्ट टर्म कोर्सेसच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कौशल्ययुक्त शिक्षणामुळे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहतील. त्यातून विद्यार्थ्यांचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होईल.’ 

शॉर्ट टर्म कोर्सेसच्या प्रमुख डॉ. सविता पाटील म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्ययुक्त शिक्षण घेतल्यास त्याला नोकरी, व्यवसायाची चांगली संधी उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे पुणे विद्यापीठाने, रयत शिक्षण संस्थेने आणि प्राध्यापकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्ययुक्त कोर्सचे धोरण स्वीकारले आहे.’ 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी, तर आभारप्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. भीमराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. रणदिवे, डॉ. रासकर, प्रा. गुजर, प्रा. किरण कुंभार, प्रा. सायली गोसावी, प्रा. माळी, डॉ. अतुल चौरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language