Ad will apear here
Next
‘ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षे करा’
नागपूर : ‘राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करावी आणि तसा निर्णय लवकरात लवकर करावा’, अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.

दरम्यान, सरकारने मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक बोलवावी आणि जोपर्यंत सदस्य समाधानी होत नाही तोपर्यंत लक्षवेधी राखून ठेवावी अशी मागणी केल्यानंतर तालिका अध्यक्षांनी ही लक्षवेधी राखून ठेवत असल्याचे जाहीर केले. दुसऱ्या आठवडयाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांची ही पहिलीच लक्षवेधी होती.

‘राज्यात एक कोटी २५ लाख इतकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. सरकारने जो ज्येष्ठ नागरिकांसाठी जीआर काढला तो जीआर अत्यंत बोगस आहे. यातल्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी केली गेली नाही. त्यामुळे या जीआरचा ज्येष्ठ नागरीकांना काहीही उपयोग झाला नाही’ असा आरोप या वेळी पवारांनी केला.

‘सरकार येत्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी उपाययोजना आखणार आहे का, या संदर्भात सरकारने मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक बोलवावी. जोपर्यंत सदस्य समाधानी होत नाही तोपर्यंत लक्षवेधी राखून ठेवावी’ अशी मागणी पवारांनी करताच तालिका अध्यक्षांनी ही लक्षवेधी राखून ठेवत असल्याचे जाहीर केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language