Ad will apear here
Next
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..!

पुणे : ‘आपलं आयुष्य फार सुंदर आहे. ते पूर्ण जगणं आवश्यक आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपली साथ एकच गोष्ट देते ते म्हणजे आपले शरीर. म्हणून शरीर सुदृढ तर जगणं सुंदर. म्हणूनच निरोगी जगा आणि अरुण दाते म्हणतात तसे ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा,’ असे मत ऑरेंज डायबेटीस फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका डॉ. शैलजा काळे यांनी व्यक्त केले.

डॉ. शैलजा काळे यांचे प्रभात रस्त्यावरील ‘डायबेटीस अँड स्पेशालिटी क्लिनिक’ नुकतेच सुरू झाले असून, त्याचे औचित्य साधून ‘नवा शुक्रतारा’ या  कार्यक्रमाचे टिळक स्मारक मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप काळे, विश्वस्त अॅड. भगवान साळुंके, प्रीती हसबनीस, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, मेधा खासगीवाले, कथक नृत्यांगना मेघना साबडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ‘डॉ. शैलजा काळेज डायबेटीस अँड स्पेशालिटी क्लिनिक’च्या माहितीपत्रकाचे औपचारिक अनावरण करण्यात आले.  ‘मधुमेह व त्याच्याशी निगडित सर्वच आजारांवर एकाच छताखाली उपचार करणारे राज्यातील हा एकमेव दवाखाना आहे,’ असे डॉ.  काळे यांनी सांगितले. 

माहितीपत्रकाचे अनावरण करताना (डावीकडून)   डॉ. दिलीप काळे, सुधीर गाडगीळ, अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते व डॉ. शैलजा काळे.

‘नवा शुक्रतारा’चा हा ४१ वा कार्यक्रम असून, पुण्यातील ११ वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात गायक व संगीतकार मंदार आपटे, गायिका श्रुती जोशी यांनी विविध गाणी सादर केली. अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जागवून रसिकांना भारावून टाकले. अरुण दाते यांच्यासोबत ७०० हून अधिक कार्यक्रम करणाऱ्या एकमेव गायिका प्रज्ञा देशपांडे यांनी या कार्यक्रमात ‘शुक्रतारा मंद वारा...’ हे गाणे सादर केले. हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. खास या गाण्यासाठी अतुल दाते यांनी त्यांना खास  बोलावले होते. त्यांना प्रसन्न बाम (हार्मोनियम), अमित कुंटे (तबला), केदार परांजपे (कि-बोर्ड), ऋतुराज कोरे (ऱ्हीदम मशीन), प्रशांत कांबळे (ध्वनी व्यवस्था) यांची उत्तम साथसंगत मिळाली. स्मिता लाटे यांनी आपल्या खुमासदार शैलीत सात कवींच्या कवितांचे वाचन केले.  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi