Ad will apear here
Next
‘पीटीआय’चे अध्यक्ष विजयकुमार चोपडा यांना ‘जीवनगौरव’
दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या शतक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन
पीटीआयचे अध्यक्ष विजयकुमार चोपडा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना डॉ. शां. ब. मुजुमदार व रवींद्र जोशी

पुणे : भारतातील मुद्रकांची पहिली संस्था असलेल्या दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त मुद्रण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले पंजाब केसरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य संपादक आणि ‘पीटीआय’चे अध्यक्ष विजयकुमार चोपडा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

रविवारी, (२२ सप्टेंबर) हयात रिजन्सी हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार आणि दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशन व  दिल्ली येथील अखिल भारतीय मुद्रक संघाचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि मानपत्र देत चोपडा यांना गौरविण्यात आले.

टोयो इंक इंडियाचे अध्यक्ष हरुहीको अकुत्सू, पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल एस. एफ. एच. रिज्वी, हरियाणाच्या दिनबंधू छोटू राम विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. राजेंद्रकुमार अनायथ यांबरोबरच दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, सचिव अतुल वाडकर, राहुल मारुलकर उपस्थित होते.  

संस्थेच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा लेखाजोखा असलेल्या ‘शतमुद्रा’ या ग्रंथाचे प्रकाशन, गेली ८० वर्षे संस्थेच्या वतीने काढण्यात येत असलेल्या ‘मुद्रण प्रकाश’ या मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन आणि मुद्रणविषयक खास पोस्टल स्टॅम्प व पाकिटाचेही अनावरण या कार्यक्रमात करण्यात आले. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची झलक दाखविणा-या ‘शंभर पानांची गोष्ट’ या माहितीपटाचे प्रदर्शनही या वेळी झाले.

जीवनगौरव पुरस्काराबरोबरच मुद्रण क्षेत्रातील यशस्वी महिला व्यवसायिक एस. टी. रेड्डियार अँड सन्सच्या सारदा राजेंद्र यांचा पहिला ‘महिला व्यावसायिक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय मुद्रण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या देशभरातील आठ व्यक्तींचादेखील सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. यामध्ये दैनिक भास्करचे संचालक गिरीश अग्रवाल, मणिपाल ग्रुपचे टी. गौतम पै, टेट्रा पॅकचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष मनोहर, आयटीसी पॅकेजिंगचे सेंगुत्तवम्, प्रगती ऑफसेटचे हर्षा व हेमंत परचुरी, रेप्लीका प्रेसचे भुवनेश सेठ, जेएएक्स प्रीमियरचे खुशरो पटेल व अस्पी फोर्ब्ज आणि एमबीडी ग्रुपच्या मोनिका मल्होत्रा यांचा सन्मान करण्यात आला.      

या वेळी बोलताना चोपडा यांनी दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशन आणि पुण्याबरोबर असलेल्या स्नेहबंधाला उजाळा देत आपल्या सभासद मुद्रकांना वाजवी दरात छपाईचे साहित्य पुरवीत पाठीशी उभे राहणाऱ्या असोसिएशनचे कौतुक केले. डॉ. मुजुमदार यांनी शंभर वर्षांत पदार्पण केलेल्या असोसिएशनचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘छपाई ही मानवी संस्कृतीतील महत्त्वाचा टप्पा असून, आज या क्षेत्रात होत असलेल्या बदलांमुळे जागतिक स्तरावर ज्ञानाचा प्रसार होत आहे,’ असेही मुजुमदार यांनी या वेळी नमूद केले.

‘दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने नजीकच्या भविष्यात मुद्रण क्षेत्राच्या क्रांतीची माहिती देणाऱ्या संग्रहालयाची उभारणी करण्याचा मानस आहे; तसेच शास्त्री रस्त्यावर असलेल्या संस्थेच्या १० हजार चौरस फूट जागेचे नुतनीकरण करीत त्या ठिकाणी एक ‘मुद्रण मॉल’ बनविण्याचे संस्थेचे स्वप्न आहे,’ असे या वेळी रवींद्र जोशी यांनी सांगितले.  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi