Ad will apear here
Next
‘देसाई आय हॉस्पिटल’तर्फे आयोजित परिषद उत्साहात

पुणे : दी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन्सच्या (पीबीएमए)  एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्यातर्फे आणि महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटी व पूना ऑप्थॅल्मिक सोसायटी यांच्या सहयोगाने नुकतेच ‘१३व्या आय इंडिया कॉन्फरन्स २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कर्नल (निवृत्त) मदन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली झाली. 

या परिषदेत देशभरातून ४००हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेचे उद्दिष्ट अंधत्वाचा बचाव करण्यासाठी योग्य, गुणवत्तापूर्ण माहितीचे स्त्रोत उपलब्ध करून देणे हा आहे. परिषदेचे उद्घाटन ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स, नवी दिल्ली) येथील प्रा. डॉ. जीवन सिंग तितियाल आणि नवी दिल्ली एम्स येथील स्ट्रॅबिस्मस आणि न्युरो-ऑफ्थॉल्मोलॉजीचे प्रा. डॉ. प्रदीप शर्मा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ‘पीबीएमए’चे अध्यक्ष (चेअरमन) नितीन देसाई, ‘पीबीएमए’चे अध्यक्ष (प्रेसिडेंट) राजेश शहा, ‘पीबीएमए’चे मानद सचिव किशोर व्होरा उपस्थित होते. 

न्युबॉर्न आय हेल्थ अलायन्सच्या (एनईएचए) संचालिका आणि हैदराबाद येथील एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटमधील एलव्हीपीईआय नेटवर्कच्या गुणवत्ता अधिकारी डॉ. सुभद्रा जलाली यांचा ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी’ या क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी प्रतिष्ठित डॉ. सलील गडकरी ओरेशन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी सर्जिकल कार्यशाळेचे आयोजन करणाऱ्या त्या जागतिक पातळीवरील पहिल्या व्यक्ती आहेत. त्यांचे बरेच शोधनिबंध प्रकाशित झाले असून, त्यांनी देशातील आणि परदेशातील बर्‍याच प्रशिक्षणार्थींना ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी’ या विषयावर मार्गदर्शन केले आहे. 

डॉ. नीता गडकरी (कै. डॉ. सलील गडकरी यांच्या पत्नी) यांच्यातर्फे रेटिनोपॅथीच्या ऑफ प्रिमॅच्युरिटी स्क्रिनिंग आणि मॅनेजमेंटसाठी ५० लाखांची उपकरणे देण्यात आली; तसेच ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी’ स्क्रिनिंगसाठी एक विशेष विभाग डॉ. सलील गडकरी यांच्या स्मरणार्थ समर्पित करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन डॉ. नीता गडकरी व डॉ. जलाली यांच्या हस्ते करण्यात आले. 

ही परिषद वैद्यकीय आणि रुग्णसेवा क्षेत्रातील व्यक्तींसाठी एक शैक्षणिक संधी होती. यामध्ये ऑप्थॉल्मोलॉजी क्षेत्रातील मुलभूत ते अद्ययावत पैलू हाताळण्यात आले. या वेळी सहभागी मान्यवरांनी त्यांचे अनुभव आणि कौशल्य सविस्तरपणे सादर केले. वैद्यकीय बाबींबरोबरच यामध्ये रुग्णांच्या नेत्रविषयक देखभालीसंबंधी प्रॅक्टीस मॅनेजमेंटविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

ही परिषद यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे, वैद्यकीय संचालिका डॉ. सुचेता कुलकर्णी, वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप डोळे आणि ‘पीबीएमए’च्या एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language