Ad will apear here
Next
राजकारणात सोयीनुसार शुद्धीकरण करण्याचे आम्ही 'त्यांच्या'कडून शिकतोय


संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल


मुंबई: मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या आखाड्यासाठी सध्या चांगलेच राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. परंतु, आता शिवसेनेच्या पालिकेतील जागा जास्त असल्याने सेना आक्रमक झाली असल्याचेही पहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सत्तेसाठी लोटांगण घालण्याचा आरोप केला आहे. राजकारणात सोयीनुसार शुद्धीकरण होऊ शकतं, हे आम्ही आता यांच्याकडून शिकत आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेससोबत जाणार नाही हे स्पष्ट करून उत्तम केले. पण खालच्या स्थरावर कॉंग्रेसोबतच्या युत्या आहेत त्याही तोडून टाकाव्यात. कॉंग्रेससोबत जाणार नाही, पण जम्मू- काश्‍मीरमध्ये देशद्रोही, पाकिस्तानप्रेमी, अफझल गुरुप्रेमी पीडीपीसोबत सत्ता भोगणार हे त्यांना सांगायचंय का? , असा खडा सवाल शिवसेनेने विचारला आहे. कॉंग्रेस बदमाश असेल, त्यांनी चोऱ्या आणि लफंगेगिरी केलेली आहे म्हणून कॉंग्रेमुक्त भारताचा नारा दिला आहे. भाजपला जर मेहबुबा मुफ्ती अस्पृश्‍य नसेल तर त्यांनी कॉंग्रेसवर टीका करु नये, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. बिहारमध्ये जर भाजपला नितीशकुमारांपेक्षा बऱ्यापैकी जागा मिळाल्या असत्या, तर त्यांनी लालू यादवांशी युती करून सरकार आणले असते आणि शुद्धीकरण केले असते. शरद पवारांचा अभ्यास दांडगा आहे, त्यांची वेगळी भूमिका असते. त्यांच्या भूमिकेबाबत त्यांना विचारा. आम्ही भाजपच्या जन्माआधीपासून कॉंग्रेसशी लढतोय, असे राऊत म्हणाले. अविश्वासदर्शक ठरावाबाबत आमच्या भूमिकेकडे जास्त लक्ष देऊ नका. आम्ही सांगून भूमिका पार पाडत नाही. आमच्या भूमिका उत्स्फूर्त असतात. महापौरपदाच्या निवडणुकीपर्यंत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. भाजपच्या जागा वाढल्या, पण वाढलेल्या जागांवरून EVM मशीनने काहूर माजलाय हे पाहताय का? राज्यभरात लोकं कोर्टात चाललेत. याची उत्तरे सुद्धा मिळतील. घोटाळे फक्त पैशांचे किंवा टेंडरचे नसतात तर निवडणुकीत सुद्धा असतात असे सांगत भाजपकडून ईव्हीएम मशीनमध्ये घोळ घातला असल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे त्यांनी केला.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language