Ad will apear here
Next
पारसिक बोगदा कारवाईस न्यायालयाची स्थगिती
ठाणे :  पारसिक बोगद्यावरील बांधकामावर प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईमध्ये बाधित होणाऱ्या रहिवाशांचे सद्यस्थितीत रेंटल हाउसिंगमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असून, तीन महिन्यात त्यांचे ‘बीएसयूपी’मध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. ज्या नागरिकांना रेंटल हाउसिंगमध्ये स्थलांतरित व्हायचे असेल, त्यांनी स्थलांतरीत व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पारसिक बोगद्यावरील मुंब्रा आणि कळवा बाजूच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. तथापि न्यायालयाने या कारवाईस अंतरिम स्थगिती दिल्याने ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे.

दरम्यान, या ठिकाणच्या रहिवाशांचे तात्पुरत्या स्वरूपात रेंटल हाउसिंगमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असून, ‘बीएसयूपी’मधील घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यात त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. तसे पत्रही महापालिकेच्या वतीने तेथील रहिवाशांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या ठिकाणी वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांनी जीवितास हानी पोहोचू नये, यासाठी रेंटल हाउसिंगमध्ये स्थलांतरित व्हावे असे आवाहनही जयस्वाल यांनी केले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language