Ad will apear here
Next
अदिती द्रविडला रोटरीतर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार
उद्योजक के. के. नाग यांच्या हस्ते अदिती द्रविडला रोटरीतर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे : लोकप्रिय युवा कलाकार अदिती द्रविडला रोटरी क्लब शिवाजीनगरतर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी उद्योजक के. के. नाग कंपनीचे अध्यक्ष मिलोन नाग, रोटरी प्रांतपाल रवी धोत्रे, माजी प्रांतपाल व संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपुर, अध्यक्ष अंजली रावेतकर उपस्थित होते . 

अदिती द्रविडने ‘माझ्या नवऱ्याची बायकोसारख्या अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ती एक उत्तम नृत्यांगना असून,  गीतकार आणि गायिका आहे. आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

तिच्या ‘वीरांगना’ या लघुपटाला पॅरिस फिक्टिव्हा फेस्टिव्हलमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. हा लघुपट  शहीद सैनिकांच्या वीरपत्नींविषयीचा आहे. अदितीचा ‘यु अँड मी’ अल्बम सध्या चांगलाच गाजत असून, ‘फ्लाय हाय’ ही संस्थाही तिने सुरू केली आहे. त्यामार्फत सामाजिक कार्यात ती सक्रीय आहे. नुकतेच तिने आपल्या संस्थेव्दारे किरकिटवाडी येथील ज्ञानज्योती विद्यामंदिरमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनचे स्वयंचलित यंत्र प्रदान केले आहे
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language