Ad will apear here
Next
‘संतवाङ्मयामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा समतोल समन्वय’
डॉ. अभय टिळक यांचे प्रतिपादन

पुणे : ‘समर्थ रामदासांनी प्रवृत्तीपर उपदेश केला आणि इतर संतांनी निवृत्तीपर मार्ग दाखवला, असे नसून समर्थांसह सर्वच संतांनी प्रवृत्ती आणि निवृत्तीचा समतोल, समन्वय साधावा असे सांगितले आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. अभय टिळक बोलत होते. डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत ह. भ. प. कै. सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार, डॉ. श्रीपाद जोशी (इंदोर) यांना आणि कै. रवींद्र भट पुरस्कार संतसाहित्यातील लक्षणीय योगदानाबद्दल मोहनबुवा रामदासी यांना देण्यात आले. डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

या वेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, समर्थ रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त व समर्थ वंशज बाळासाहेब स्वामी, आणि स्वामी मकरंदनाथ वझे उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘ज्या संतांनी जात, धर्म आणि पंथ यांच्या भिंती मोडून राष्ट्रीय एकात्मतेच्या पलिकडे जाऊन वैश्विक एकात्मतेची भूमिका मांडली त्या संतांना जाती जातीत विभागण्याचे षडयंत्र आज सुरू आहे. हा पुरोगामी महाराष्ट्राचा पराभव आहे.’ 

याप्रसंगी परीक्षकांच्या वतीने डॉ. अविनाश अवलगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. ‘हा पुरस्कार म्हणजे आजवर केलेल्या कामासाठी मिळालेला समर्थांचा प्रसाद आहे’, अशी भावना मोहनबुवा रामदासी यांनी व्यक्त केली. डॉ. श्रीपाद जोशी यांनीही आपले विचार मांडले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language