Ad will apear here
Next
छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य
मुघल व निजामशाहीच्या दक्षिणेकडील संघर्षात निजामाने एतद्देशीय मराठ्यांना हाताशी धरून आक्रमण थोपविण्याचा प्रयत्न केला. यातूनच मराठ्यांचा लष्करी विकास होऊन मराठा राज्याचा उदय झाला. या विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहाजी महाराज, असा इतिहासाचा दाखला देत डॉ. नीरज साळुंखे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य’मधून शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराचा आढावा घेतला आहे.

मराठा राज्य हे शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एकत्रित कृती होती, हे लक्षात घेऊन याची मांडणी केल्याचे लेखक सांगतात. यामुळे कुकळ्ळीच्या धर्मयुद्धापासून मराठ्यांची घराणी, शहाजी महाराजांचा स्वतंत्र कारभार व त्यांची जहागिरी, दक्षिणेकडील मोहिमा यांचा इतिहास येतो. एकोजीराजांचे तंजावरचे राज्य, शिवाजी महाराजांच्या दक्षिणेतील स्वाऱ्या व विजय, तेथील मंदिरे, किल्ले यांची माहिती, असा गुजरात ते श्रीलंकेपर्यंतच्या शिवसाम्राज्याचा इतिहास येथे संदर्भ छायाचित्रांसह दिला आहे.
      
पुस्तक : छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य
लेखक : डॉ. नीरज साळुंके
प्रकाशक : लोकायत प्रकाशन
पाने : १६४
किंमत : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language