Ad will apear here
Next
राजनाथसिंह नवे संरक्षणमंत्री; अमित शहांकडे गृहखाते; खातेवाटप जाहीरनवी दिल्ली :
नरेंद्र मोदी यांनी ३० मे २०१९ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपतिभवनात झालेल्या शानदार सोहळ्यात त्यांच्यासह एकूण ५८ मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळाचे खातेवाटप ३१ मे २०१९ रोजी जाहीर झाले आहे. राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली असून, ‘भाजपचे चाणक्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात २४ कॅबिनेट मंत्री आणि २४ राज्यमंत्री आहेत. नऊ मंत्र्यांकडे राज्यमंत्रिपदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाचे सविस्तर खातेवाटप येथे देत आहोत.

नरेंद्र मोदी : पंतप्रधान

कार्मिक, सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा विभाग, अवकाश विभाग, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि अन्य मंत्र्यांकडे देण्यात न आलेली उर्वरित सर्व खाती.

कॅबिनेट मंत्री

राजनाथसिंह : संरक्षण 


अमित शहा : गृह


नितीन जयराम गडकरी : रस्ते वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग


डी. व्ही. सदानंद गौडा : रसायने आणि खते


निर्मला सीतारामन : अर्थ आणि कंपनी कामकाज (कॉर्पोरेट अफेअर्स)


रामविलास पासवान : ग्राहक संरक्षण, अन्न, नागरी पुरवठा

नरेंद्रसिंह तोमर : कृषी आणि शेतकरी विकास, ग्रामविकास आणि पंचायती राज


रविशंकर प्रसाद : कायदा आणि न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान


हरसिम्रतकौर बादल : अन्नप्रक्रिया उद्योग


थावरचंद गेहलोत : सामाजिक न्याय आणि सबलीकरण


डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर : परराष्ट्र व्यवहार


रमेश पोखरियाल निशंक : मनुष्यबळ विकास


अर्जुन मुंडा : आदिवासी विकास


स्मृती झुबिन इराणी : महिला, बालविकास आणि वस्त्रोद्योग.


डॉ. हर्ष वर्धन : आरोग्य आणि कुटुंबकल्याण, विज्ञान-तंत्रज्ञान, भू-विज्ञान


प्रकाश जावडेकर : पर्यावरण, वने आणि हवामानबदल, माहिती आणि प्रसारण


पीयूष गोयल : रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग


धर्मेंद्र प्रधान : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पोलाद


मुख्तार अब्बास नक्वी : अल्पसंख्याक


प्रल्हाद जोशी : संसदीय कामकाज, कोळसा आणि खाणी


डॉ. महेंद्रनाथ पांडे : कौशल्यविकास आणि उद्योजकता


अरविंद सावंत : अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग


गिरिराजसिंह : पशुधन विकास, डेअरी आणि मत्स्य

गजेंद्रसिंह शेखावत : जलशक्ती


राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) :

संतोषकुमार गंगवार : कामगार आणि रोजगार

राव इंद्रजितसिंह : सांख्यिकी, कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन

श्रीपाद येसो नाईक : आयुष (स्वतंत्र कार्यभार) आणि संरक्षण राज्यमंत्री

डॉ. जितेंद्रसिंह : ईशान्य भारत विकास (स्वतंत्र कार्यभार), प्रधानमंत्री कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा विभाग, अवकाश विभाग (राज्यमंत्री)

किरण रिजिजू : युवक कल्याण आणि क्रीडा (स्वतंत्र कार्यभार), अल्पसंख्याक मंत्रालय (राज्यमंत्री)

प्रल्हादसिंह पटेल : सांस्कृतिक कार्य, पर्यटन 

राजकुमारसिंह : ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार), कौशल्यविकास आणि उद्योजकता (राज्यमंत्री)

हरदीपसिंग पुरी : गृहबांधणी आणि नगरविकास, नागरी विमान वाहतूक (स्वतंत्र कार्यभार), वाणिज्य आणि उद्योग (राज्यमंत्री)

मनसुखलाल मांडवीय : जहाजबांधणी (स्वतंत्र कार्यभार), रसायने आणि खते (राज्यमंत्री)


राज्यमंत्री : 

फग्गनसिंह कुलस्ते : पोलाद

अश्विनीकुमार चौबे : आरोग्य आणि कुटुंबकल्याण

अर्जुनराम मेघवाल : संसदीय कामकाज, अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग

(निवृत्त) जनरल व्ही. के. सिंह : रस्ते वाहतूक, महामार्ग

किशनपाल गुज्जर : सामाजिक न्याय आणि सबलीकरण

रावसाहेब दानवे : ग्राहक संरक्षण, अन्न, नागरी पुरवठा

जी. किशन रेड्डी : गृह

पुरुषोत्तम रूपाला : कृषी आणि शेतकरी विकास

रामदास आठवले : सामाजिक न्याय आणि सबलीकरण

साध्वी निरंजन ज्योती : ग्रामविकास

बाबुल सुप्रियो : पर्यावरण, वने आणि हवामानबदल

संजीवकुमार बाल्यां : पशुधन विकास, डेअरी आणि मत्स्य

अॅड. संजय धोत्रे : मनुष्यबळ विकास, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान

अनुरागसिंह ठाकूर : अर्थ आणि कंपनी कामकाज (कॉर्पोरेट अफेअर्स)

सुरेश अंगडी : रेल्वे

नित्यानंद राय : गृह

रतनलाल कटारिया : जलशक्ती, सामाजिक न्याय आणि सबलीकरण

व्ही. मुरलीधरन : परराष्ट्र व्यवहार, संसदीय कामकाज

रेणुकासिंह सारुता : आदिवासी विकास

सोम प्रकाश : वाणिज्य आणि उद्योग

रामेश्वर तेली : अन्नप्रक्रिया उद्योग

प्रतापचंद्र सारंगी : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, पशुधन विकास, डेअरी आणि मत्स्य

कैलाश चौधरी : कृषी आणि शेतकरी विकास

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language