Ad will apear here
Next
‘सर्वंकष लोकशाहीचा विचार होणे गरजेचे’
‘निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी डावीकडून अरूण खोरे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डॉ. विकास आबनावे.

पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक आणि समताधिष्ठित लोकशाहीची कल्पना मांडली होती; परंतु, त्यांच्या या कल्पनेला गेल्या ७० वर्षांत तडे गेले असून, केवळ राजकीय लोकशाहीचे अस्तित्त्व आज आपण पाहतो आहोत. त्यामुळे राजकीय लोकशाहीचे सर्वंकष लोकशाहीमध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ संपादक अरूण खोरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळातर्फे प्रा. रतनलाल सोनग्रा लिखित ‘निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो’ पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रा. रतनलाल सोनग्रा, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

खोरे म्हणाले, ‘बाबासाहेबांच्या विचारांचा, कार्याचा जागर जगभर होण्यासाठी प्रा. रतनलाल सोनग्रा प्रयत्न करीत आहेत. लोकशाही प्रक्रियेतील त्यांचे स्थान अधोरेखित होत आहे. बाबासाहेबांच्याच शब्दांत मांडलेल्या या चरित्र कहाणीमुळे आपल्या जीवनाला एक दिशा मिळेल.’

प्रा. सोनग्रा म्हणाले, ‘परिस्थितीशी लढा देत घडलेल्या बाबासाहेबांचे जीवन आपणा सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या विचारांना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे विचार, अनुभव त्यांच्याच शब्दात मांडले आहेत. साचेबद्द लिखाण होण्यापेक्षा समग्र बाबासाहेब लिहिले पाहिजेत.’

डॉ. आबनावे म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत भारतीय राज्यघटनेला धक्का लावण्याचे काम काही राजकारणी न्यायालयाच्या आडून करीत आहेत; परंतु आंबेडकरांच्या विचारातून आलेल्या या राज्यघटनेचे स्थान अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करून कृतिशील विद्वान निर्माण व्हावेत.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language