Ad will apear here
Next
‘एनआयपीएम’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी
विश्वेश कुलकर्णी
पुणे : मनुष्यबळ विकास क्षेत्रातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट अर्थात ‘एनआयपीएम’ या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी यांची निवड झाली आहे. २०१८-२०२० या कार्यकाळासाठी बहुमताने ही निवड करण्यात आली आहे. विश्वेश कुलकर्णी यांची ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून निवड झाल्याने ३५ वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली आहे. 

संस्थेचे संपूर्ण देशभर पस्तीस हजार सभासद असून, ५३ विभागीय केंद्रांमार्फत संस्था कार्यरत आहे. विश्वेश कुलकर्णी हे ‘यशस्वी’ या संस्थेचे अध्यक्ष असून, मनुष्यबळ व कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये गेली ३०-३५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष म्हणूनही याआधी काम पाहिले आहे. त्यांच्याच अध्यक्षतेखाली येथे पश्चिम विभागीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language